advertisement

Amravati: 'दिल्लीसारखं अमरावतीला बॉम्बने उठवून देऊ' धमकीच्या फोन कॉलमुळे खळबळ, अखेरीस..

Last Updated:

दिल्लीच्या घटनेनंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या फोन कॉलनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली.

News18
News18
अमरावती : राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच अमरावतीमध्ये एका निनावी धमकीच्या फोन कॉलमध्ये खळबळ उडाली आहे. दिल्लीसारखं अमरावती शहर बॉम्बने उठवून देऊ अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा एका निनावी फोन आला होता. फोनवर समोरील व्यक्तीने अमरावती शहराला दिल्लीसारखं बॉम्ब स्फोटाने उठवून टाकणार, अशी धमकी दिली होती. सुरुवातील कुण्या माथेफिरूचं हे कृत्य असेल म्हणून वाटलं. पण दिल्लीच्या घटनेनंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या फोन कॉलनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली.
advertisement
पोलिसांनी रात्रीभर हायअलर्ट जारी केला. अनेक एजन्सी सक्रिय करण्यात आल्या. शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ठिकठिकाणी तपास मोहीम राबवण्यात आली. ज्या फोन नंबरवरून फोन आला होता तो नंबर अखेरीस पोलिसांनी ट्रेस केला. तेव्हा हा फोन इंदुरमधून आला होता, अशी माहिती समोर आली.
नंबर ट्रेसिंगनंतर कॉल करणाऱ्याचा लोकेशन इंदुरमध्ये सापडलं आहे. त्यानंतर  अमरावती पोलिसांची एक टीम तातडीने इंदुरला रवाना झाली. इंदूर पोलीस आणि अमरावती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला ताब्यात  घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीला उद्यापर्यंत घेऊन अमरावतीत आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
आारोपीला ताब्यात घेण्यात आल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, या व्यक्तीने अमरावती पोलिसांनाच का फोन केला, फोन करण्याचं कारण काय आहे, याची उत्तरं आरोपीच्या चौकशीतून समोर येतील. या प्रकरणाचा अधिक तपास अमरावती पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati: 'दिल्लीसारखं अमरावतीला बॉम्बने उठवून देऊ' धमकीच्या फोन कॉलमुळे खळबळ, अखेरीस..
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement