Free Abhyasika: महाराष्ट्रातील असंही मंदिर, जिथं चालवली जाते मोफत अभ्यासिका, आतापर्यंत 29 विद्यार्थी शासकीय सेवेत, Video

Last Updated:

ही अभ्यासिका कोरोना काळात होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कुठलीही फी लागत नाही.

+
Library 

Library 

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील श्री क्षेत्र टाकरखेडा येथे श्री संत लहानुजी महाराज यांचे समाधी स्थळ आहे. श्री संत लहानुजी महाराज संस्थान हे वर्धा जिल्ह्यातील नामांकित संस्थानांपैकी एक आहे. त्याठिकाणी अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी एक शैक्षणिक उपक्रम म्हणजे लहानु अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र. ही अभ्यासिका कोरोना काळात होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कुठलीही फी लागत नाही. त्यांना सर्व सुविधा संस्थानमार्फत दिल्या जातात. या अभ्यासिकेतून आतापर्यंत जवळपास 29 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.
लहानु अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र याबाबत माहिती देताना संचालक डॉ. सतीश ठाकरे सांगतात की, आमची ही संस्था फक्त मंदिर म्हणून समाजात प्रचलित न राहता त्याची काही वेगळी एक ओळख असावी, असा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रात काम करत आहोत. कोरोना काळ म्हटलं की, सगळ्यांना धडकी भरते. कारण त्याकाळात आपल्याच माणसांना आपल्याला हात लावताना नकार देताना आपण बघितलंय. सर्व मंदिरे बंद होती, त्याच काळात आमच्या येथे ही अभ्यासिका मुलांसाठी सुरू करण्यात आली
advertisement
प्रवेश घेण्यासाठी पात्रता आणि प्रोसेस काय
लहानु अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र येथे प्रवेश घेण्याकरिता सर्वात आधी याठिकाणी येऊन माहिती घ्यावी लागते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याला याठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. त्याचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा. त्याचा कल स्पर्धा परीक्षेकडे असावा. या दोन बाबींनंतर त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर तो जर पात्र असेल तर त्याला प्रवेश दिला जातो. मुले - मुली कोणीही याठिकाणी प्रवेश घेऊ शकतात. 40 जणांची पात्रता आहे. मात्र, 50 विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेश दिला जातो, अशी माहिती सतीश ठाकरे यांनी दिली.
advertisement
सुविधा कोणकोणत्या दिल्या जातात
प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह याठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर दोन वेळचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जाते. आरोग्यासाठी दवाखाना याठिकाणी उपलब्ध आहे. 10 रुपये देऊन दवाखाना विद्यार्थी करू शकतात. जेवण आणि राहण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क लागत नाही. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या परीक्षा फी सुद्धा संस्थानकडून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना लागणारी सर्व पुस्तके, लॅपटॉप सुद्धा त्याठिकाणी उपलब्ध आहेत, डॉ. सतीश ठाकरे सांगतात.
मराठी बातम्या/अमरावती/
Free Abhyasika: महाराष्ट्रातील असंही मंदिर, जिथं चालवली जाते मोफत अभ्यासिका, आतापर्यंत 29 विद्यार्थी शासकीय सेवेत, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement