Tribal culture: दुर्गम भागातलं आदिवासी समाजाचं जग, अशा गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील, संगिता यांच्याकडून ऐकाच!
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आदिवासी नृत्य परंपरा ही त्यांच्या संस्कृतीचा अत्यंत जिवंत भाग आहे. त्यांच्यासाठी नृत्य हे फक्त मनोरंजन नसून, ते सण-उत्सव, धार्मिक श्रद्धा, शेती, आणि सामाजिक एकतेशी जुळवून घेण्याच साधन आहे.
अमरावती: आदिवासी संस्कृती खूप समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे. तसेच ती निसर्गाशी घट्ट जोडलेली आहे. तसेच आदिवासी नृत्य परंपरा ही त्यांच्या संस्कृतीचा अत्यंत जिवंत भाग आहे. त्यांच्यासाठी नृत्य हे फक्त मनोरंजन नसून, ते सण-उत्सव, धार्मिक श्रद्धा, शेती आणि सामाजिक एकतेशी जुळवून घेण्याचं साधन आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीची जपवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. यासाठीच अमरावती जिल्ह्यातील शिक्षिका संगीता सोळंके या प्रयत्न करीत आहेत. आदिवासी नृत्य परंपरा जिवंत राहावी यासाठी त्या स्वतः नृत्य बसवतात. स्वतः आदिवासी नृत्यासाठी लागणारे दागिने तयार करतात.
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षिका संगीता सोळंके यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, आदिवासी संस्कृती ही निसर्गाशी जुळलेली आहे. त्यामुळे ती जपणे गरजेचे आहे. मी त्यांच्यासोबत आणि जवळ राहून काम केलं आहे. त्यामुळे नृत्याच्या माध्यमातून त्यांची संस्कृती समाजासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्या सांगतात.
advertisement
तारपा नृत्य वारली आदिवासी (महाराष्ट्र), गोंडी नृत्य गोंड जमात (विदर्भ, मध्यप्रदेश), डांडारी नृत्य गोंड आणि कोलाम आदिवासी, झावरा नृत्य कोरकू समाज (मेळघाट), चेरो नृत्य झारखंड आणि बिहारातील आदिवासी, झुमर नृत्य उलगुलान संस्कृतीशी जोडलेले (झारखंड), सण नृत्य पिकांच्या हंगामानंतरचा आनंदोत्सव, धोल नृत्य राजस्थान आणि गुजरातमधील भिल्ल समाज हे आदिवासी नृत्य प्रकार आहेत.
advertisement
राज्यातील अतिशय दुर्गम भागात देखील मी काम केले आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीबाबत आपुलकी आहे. त्यांचा पेहराव, नृत्य, खाद्य संस्कृती ही जवळून अभ्यासली आणि त्यावर काम केले. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी नृत्य शिकवणे, त्यांना आदिवासी दागिने तयार करून देणे हेच काम मी करत आले आहे. आतापर्यंत मी विविध ठिकाणी 12 पेक्षा जास्त नृत्य बसवले आहे.
advertisement
मागील वर्षी दाभा येथील शाळेत मिझोरम राज्याचे बांबू नृत्य देखील तयार केले होते. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी ते सादर केले. आदिवासी दागिने मी कधी पिठापासून बनवते तर कधी विविध साहित्य वापरून तयार करते. यामुळे शाळेतील मुलांना सुद्धा आदिवासी संस्कृतीबाबत माहिती मिळते. तसेच विविध राज्यातील संस्कृतीबद्दल माहितीदेखील मी विद्यार्थ्यांना नेहमी देत असते, असे त्या सांगतात.
advertisement
खाद्यसंस्कृती बाबत मुलांना माहिती
आदिवासी संस्कृती ही खरंच घेण्यासारखी आहे. कारण त्यात सर्व पारंपरिक पद्धतीने केले जाते. आधुनिकतेचा त्याला स्पर्श सुद्धा झालेला नाही. खाद्य संस्कृती देखील त्यांची अतिशय पारंपरिक आहे. पिझ्झा, बर्गर याची त्यांना आवड सुद्धा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील त्याबाबत जागरूकता असावी म्हणून मी तृणधान्य प्रचार आणि प्रसार केला. त्यात कोदो, कुट्टी, कंगनी, रागी, चना इत्यादी बाबत माहिती दिली. त्यापासून तयार होणाऱ्या विविध रेसिपी देखील त्यांना सांगितल्या. स्वतः भारुड लेखन करून त्यांना त्याबाबत जागरूक आणि शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आणखी बरेच कार्यक्रम मी विद्यार्थ्यांसाठी केलेत, असे त्या सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Aug 09, 2025 5:52 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Tribal culture: दुर्गम भागातलं आदिवासी समाजाचं जग, अशा गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील, संगिता यांच्याकडून ऐकाच!








