नवरात्री विशेष : अमरावतीमधील 5 आकर्षक देवींची मूर्ती, भाविकांची होते मोठी गर्दी, विलोभनीय दृश्य, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
navratri special - अमरावती वासियांचे कुलदैवत अंबादेवी हे अमरावतीमधील प्रमुख आकर्षण आहेच. पण नवरात्रीमध्ये अमरावती शहरात अनेक ठिकाणी देवीची स्थापना केली जाते. त्यात अनेक आकर्षक देवीच्या मूर्ती स्थापित करण्यात येते. त्यापैकी 5 आकर्षक देवींच्या मूर्तींबाबत आपण आज जाणून घेऊयात.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती - अमरावती वासियांचे कुलदैवत अंबादेवी हे अमरावतीमधील प्रमुख आकर्षण आहेच. पण नवरात्रीमध्ये अमरावती शहरात अनेक ठिकाणी देवीची स्थापना केली जाते. त्यात अनेक आकर्षक देवीच्या मूर्ती स्थापित करण्यात येते. त्यापैकी 5 आकर्षक देवींच्या मूर्तींबाबत आपण आज जाणून घेऊयात.
1. गांधी चौक आणि अंबादेवी परिसरात असलेली तुळजाभवानी दुर्गा मंडळाची मूर्ती - ही मूर्ती भव्य आणि आकर्षक आहे. त्याचबरोबर आई तुळजा भवानीची प्रतिकृती या मूर्तीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.
advertisement
2. अंबादेवी परिसरातच अंबागेटच्या बाजूला श्री पंचदिप नवरात्री महोत्सव येथे 21 फूट असलेली विदर्भाची राणी म्हणून भव्य अशी देवीची मूर्ती आहे. जवळून बघितले असता ही मूर्ती अतिशय आकर्षक आणि भव्य असल्याचे जाणवते.
advertisement
3. अंबागेटच्या आत भाजी बाजार शाळा क्रमांक 6 च्या प्रांगणामध्ये विदर्भाची महाराणी म्हणून सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती अमरावती शहरातील प्रमुख आकर्षण ठरली आहे. ही मूर्ती सुद्धा 21 फूट आहे. श्री अंबानगरी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.
advertisement
4. राजापेठच्या मागच्या बाजूला भुतेश्वर चौक येथे महाकालीची मूर्ती स्थापित केली आहे. मूर्तीला बघताच हुबेहूब महाकाली समोर असल्याचा भास होतो. ही मूर्ती जय भवानी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने स्थापित करण्यात आली आहे. याच देवीच्या पुढे काली मातेचे मंदिर आहे.
5. अमरावती बस स्टॉपच्या बाजूला सायन्स स्कोअर मैदान येथे सुद्धा देवीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोठी दांडिया स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाते. ही मूर्ती आकाराने छोटी असली तरी आकर्षक आहे.
advertisement
या अमरावती मधील आकर्षक देवीच्या मूर्ती बाबत आपण जाणून घेतले. अंबादेवी परिसरात असलेली विदर्भाची राणी आणि अंबागेटच्या आतमध्ये असलेली विदर्भाची महाराणी या दोन्ही मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत. त्यामुळे या दोन्ही मूर्ती नवरात्री मधील प्रमुख आकर्षण ठरल्या आहेत.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
October 09, 2024 5:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
नवरात्री विशेष : अमरावतीमधील 5 आकर्षक देवींची मूर्ती, भाविकांची होते मोठी गर्दी, विलोभनीय दृश्य, VIDEO