Navratri 2025: 80 वर्षांची परंपरा अन् शुद्धतेवर विश्वास, नवरात्रीसाठी या ठिकाणी मिळतायेत तांबा-पितळेचे अँटिक दिवे
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Navratri 2025: नवरात्रीसाठी लागणाऱ्या पितळी दिव्यांचे अनेक प्रकार दुकानात उपलब्ध आहेत.
नाशिक: आजपासून (22 सप्टेंबर) नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये घटस्थापना आणि देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. नवरात्रौत्सवात पूजेसाठी तांबा-पितळेच्या वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे नाशिकमधील बाजरपेठेतील भांड्यांच्या दुकानांमध्ये महिलावर्ग गर्दी करताना दिसत आहे. नाशिकमधील 'ज्ञानेश्वर शंकर आंबेकर' या दुकानात तांबा-पितळेच्या अनेक आकर्षक वस्तू आणि देवीच्या मूर्ती देखील उपलब्ध आहेत.
या दुकानाला 80 वर्षांची परंपरा आहे. तांब्याच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या दुकानात नवरात्रीच्या पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या देवीच्या मूर्ती तसेच पूजेसाठी लागणार तांबा-पितळेचं इतर साहित्य स्वस्त आणि शुद्ध स्वरुपात मिळत असल्याने नागरिक यांच्याकडे येतात.
advertisement
आंबेकर बंधू गेल्या 80 वर्षांपासून तांबा-पितळेच्या वस्तू घडवण्याचा आणि विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यांच्याकडे तांबा-पितळेच्या अँटिक वस्तू मिळत असल्याने नाशिककरांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. नवरात्रीसाठी लागणाऱ्या पितळी दिव्यांचे अनेक प्रकार दुकानात उपलब्ध आहेत. चावीचे दिवे, काचेचे दिवे, तांब्याचे दिवे, पितळी दिवे, लहान समई आणि मोठी समई असे दिव्यांचे प्रकार योग्य किमतीत मिळत आहेत. इतकेच नाही तर नवदुर्गांची रूपं असलेल्या मूर्ती देखील या दुकानात उपलब्ध आहेत.
advertisement
ज्ञानेश्वर शंकर आंबेकर हे दुकान तांबा-पितळेच्या अँटिक वस्तूंसाठी खूप प्रसिद्ध आहे. याठिकाणी पूजेच्या साहित्या व्यतिरिक्त तांब्यापासून बनवलेल्या गृहसजावटीच्या वस्तू आणि भेटवस्तू देखील होलसेल आणि रिटेल स्वरुपात उपलब्ध आहेत. नाशिकमधील भांडी बाजारातील बालाजी मंदिराच्या बाजूला हे दुकान आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 22, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: 80 वर्षांची परंपरा अन् शुद्धतेवर विश्वास, नवरात्रीसाठी या ठिकाणी मिळतायेत तांबा-पितळेचे अँटिक दिवे