advertisement

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Last Updated:

Manikrao Kokate : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे यांच्याविरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे.

मोठी बातमी! अखेर माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी, कोर्टाचा दणका, खडे बोल सुनावले
मोठी बातमी! अखेर माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी, कोर्टाचा दणका, खडे बोल सुनावले
नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे यांच्याविरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे. अटक वॉरंट विरोधात माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाने कोर्टात धाव घेतली होती. कोकाटे यांना सरेंडरसाठी काही दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, कोर्टाने ही विनंती फेटाळून लावताना खडे बोल सुनावले.
advertisement
सदनिका घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने 16 नोव्हेंबर रोजी याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता कोकाटे यांना आमदारकी गमवावी लागण्याची शक्यता आहे.
अॅड. मनोज पिंगळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावतीने युक्तिवाद केला. अटक वॉरंट टाळण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला होता. माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सरेंडर करण्यासाठी ४ दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी वकिलांनी केली होती. माणिकराव कोकाटे हे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी कोर्टाला दिली. मात्र, कोर्टाने ही विनंती फेटाळून लावताना कोकाटे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. कोकाटे यांनी कायद्याचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे कोर्टाने सांगितले.
advertisement
दरम्यान,  माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू हे दोन्ही जण नॉट रिचेबल आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याची माहिती आहे.  मात्र, हायकोर्टाकडून आदेश येण्यापूर्वीच आता कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांविरोधात अटकेची टांगती तलवार आहे.  या दोघांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
सुमारे ३० वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारकडून तक्रार देण्यात आली होती, जिल्हा प्रशासनानेही चौकशी केली होती.
advertisement
या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Next Article
Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
  • महाराष्ट्र केसरीचा विजेता मालामाल होणार

  • फॉर्च्युनर गाडीसह रोख बक्षीस मिळणार

  • मानाची गदा कोण पटकावणार?

View All
advertisement