'आर्ट ऑफ लिविंग'च्या शिक्षिकेनं संपवलं जीवन, हिमाचलमधून अलिबागमध्ये आली अन् प्यायली विष
- Published by:Suraj
Last Updated:
आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून जगण्याचे धडे देणाऱ्या शिक्षिकेनंच आत्महत्या केल्याची घटना अलिबागमध्ये उघडकीस आली आहे.
मोहन जाधव, प्रतिनिधी
रायगड : आर्ट ऑफ लिविंगमध्ये जगण्याचे धडे देणाऱ्या शिक्षिकेनंच जीवन संपवल्याची घटना घडलीय. मुंबईतील तरुणी हिमाचल प्रदेशमध्ये आर्ट ऑफ लिविंगचं काम करत होती. तिथून ती थेट अलिबागला आली आणि तिथँ एका कॉटेजमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. तिने सुसाइड नोटही लिहिली असून त्यात तिनं हॉटेल आणि जेवणाचे पैसे ठेवले असल्याचा उल्लेखही केला आहे.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव नेहा पोतदार असं आहे. मुंबईत गोरेगाव इथं राहणारी ३४ वर्षीय नेहा आर्ट ऑफ लिविंगची शिक्षिका होती. ती हिमाचल प्रदेशातून परतल्यानंतर कुरुळ इथं एका कॉटेजमध्ये रूम बूकिंग करून राहत होती. बुधवारी नेहा रूममधून बाहेर न आल्यानं कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला. कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटी हॉटेल प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर नेहा मृतावस्थेत आढळली. तिने विष पिऊन आत्महत्या केली.
advertisement
आत्महत्येआधी नेहाने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. त्यात तिनं हॉटेल आणि जेवणाचे पैसे ठेवल्याचा उल्लेख केलाय. तसंच आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असंही म्हटलंय. मागील काही दिवसांपासून ती तणावाखाली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. नेहाचा मृतदेहाचा पंचनामा झाल्या नंतर तिचा मृतदेह शवविच्छेदन करून तिच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.दरम्यान, तिच्या मृत्यू प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2024 9:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आर्ट ऑफ लिविंग'च्या शिक्षिकेनं संपवलं जीवन, हिमाचलमधून अलिबागमध्ये आली अन् प्यायली विष


