advertisement

Ashok Kharat Case: ''मासा ही पाण्यातील वनस्पती, रक्त नाही...'',भोंदू खरातनं शाकाहारी व्यक्तींना प्रसादाच्या नावाखाली लुबाडलं

Last Updated:

Ashok Kharat Case: अशोक खरातची आणखी एक बंडलबाजी समोर आली आहे. अशोक खरातने शाकाहारी व्यक्तींना मासा पाण्यातील वनस्पती असल्याचे सांगत त्यांना खाऊ घातला.

''मासा ही पाण्यातील वनस्पती, रक्त नाही...'',भोंदू खरातनं शाकाहारी व्यक्तींना प्रसादाच्या नावाखाली लुबाडलं
''मासा ही पाण्यातील वनस्पती, रक्त नाही...'',भोंदू खरातनं शाकाहारी व्यक्तींना प्रसादाच्या नावाखाली लुबाडलं
पुणे: स्वयंघोषित ज्योतिष, तांत्रिक भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. शेकडो महिलांच्या लैगिंक शोषणाचा आरोपी असणाऱ्या भोंदू खरातने कोट्यवधींची संपत्ती जमवली. खरातने आपला बोलबाला इतका केला की, त्याच्याकडे सामान्यांपासून ते उद्योजक, राजकारणी मंडळींची रीघ लागायची. त्यातूनच त्याने महिला भक्तांचे शोषण केल्याचे समोर आले. या प्रकरणाची चौकशी आता एसआयटी कडून सुरू असून या खरातची आणखी एक बंडलबाजी समोर आली आहे. अशोक खरातने शाकाहारी व्यक्तींना मासा पाण्यातील वनस्पती असल्याचे सांगत त्यांना खाऊ घातला.
लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या बंडलबाज खरातच्या फसवणुकीचे एकापेक्षा एक विचित्र प्रकार समोर येत आहेत. 'मासा ही वनस्पती आहे', असे सांगून त्याने अनेक शाकाहारी कुटुंबांना मासा खाण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती एसआयटी (SIT) तपासात उघड झाली आहे. या भोंदूने चक्क जैन धर्मीय व्यावसायिकांनाही आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली आहे.
advertisement

अशी केली फसवणूक

खरात हा लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत असे. शाकाहारी असलेल्या भाविकांना त्याने चुना लावला. "मासा हा प्राणी नसून ती पाण्यात उगवणारी एक वनस्पती आहे." इतकेच नव्हे तर, "मासा कापल्यावर रक्त येत नाही आणि त्यात हाडे नसतात," असा जावईशोध लावून त्याने अनेकांची दिशाभूल केली. हा मासा नसून एक प्रकारचे 'प्रसाद' असल्याचे भासवून त्याने अनेकांना मांसाहार करण्यास प्रवृत्त केले.
advertisement

जैन व्यावसायिकांना लावला लाखो रुपयांचा चुना

अहिंसेचे पालन करणाऱ्या जैन धर्मीय व्यावसायिकांनाही खरातने सोडले नाही. मासा ही वनस्पती असल्याचा खोटा प्रचार करून त्याने या व्यावसायिकांकडून 'प्रसादा'च्या नावाखाली लाखो रुपयांची देणगी वसूल केली. त्याच्या या अजब दाव्यांना बळी पडून अनेक सुशिक्षित लोकही त्याच्या जाळ्यात अडकले होते. यामध्ये सीए, दुकानदार, व्यावसायिकांचा समावेश आहे.
advertisement

एसआयटी तपासात कारनामे उघड

खरात विरुद्ध तक्रारी वाढल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत त्याचे हे सर्व काळे कारनामे उघड झाले आहेत. एसआयटी आता या प्रकरणात खरातच्या इतर साथीदारांचा आणि आर्थिक व्यवहारांचा शोध घेत आहे. खरातशी संबंधित असलेल्या व्यक्ती एसआयटीच्या रडारवर आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: ''मासा ही पाण्यातील वनस्पती, रक्त नाही...'',भोंदू खरातनं शाकाहारी व्यक्तींना प्रसादाच्या नावाखाली लुबाडलं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement