advertisement

खरातच्या पापांच्या घडा फोडणारा नीरज समोर, 58 सीसीटीव्ही फुटेज चोरणाऱ्या ऑफिस बॉयचा फोटो

Last Updated:

अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव हाच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

News18
News18
नाशिक: नाशिकसह अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या 'कॅप्टन फाईल्स' प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक कृष्णकृत्याचा सूत्रधार दुसरा कोणी नसून संशयित अशोक खरातचा सावलीसारखा सोबत राहणारा 'ऑफिस बॉय' नीरज जाधव असल्याचे उघड झाले आहे. ज्या कार्यालयात महिलांचे रक्षण व्हायला हवे होते, त्याच 'ओजस प्रॉपर्टीज'च्या बंद दाराआड 100 हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे चित्रीकरण करून आपल्याच मालकाला 5 कोटींच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या या 'मास्टरमाइंड'चा फोटो आता समोर आला आहे.
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील 'ओजस प्रॉपर्टीज' या कार्यालयाच्या भिंतींआड सुरू असलेल्या वासनांध खेळाचा पडदा आता फाटला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव हाच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. नीरजने केवळ खरातच्या दुष्कृत्यांचे चित्रीकरणच केले नाही, तर त्याआधारे खरातलाच पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
advertisement

पीडित महिलांनाच लक्ष्य का केलं? 

डिसेंबर 2025 मध्ये नीरजने खरातच्या नकळत कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणेतून 58  क्लिप्स आणि 100 हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आपल्या ताब्यात घेतले. समाजात 'साधू' आणि 'भविष्यवेत्ता' म्हणून वावरणाऱ्या खरातचा खरा चेहरा नीरजला ठाऊक होता. पैशांच्या हावेपोटी नीरजने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने खरातकडे पाच कोटींची मागणी केली. मात्र, खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
advertisement

कसं समोर आलं रॅकेट

नीरजने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले व्हिडिओ तिला पाठवून धमकावले. घाबरलेल्या महिलेने खरातला ही बाब सांगितली, मात्र स्वतःवरची टांगती तलवार पाहून खरातने तिलाच पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नीरजने सिडकोतील एका 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवून दबाव तंत्राचा वापर केला. मात्र, त्या मेहुण्याने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि पीडितेला दिलेल्या आधारामुळे हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.
advertisement

100 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती

नाशिक पोलिसांनी आता या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नीरज जाधवने रेकॉर्ड केलेले 100 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात अनेक प्रतिष्ठित महिलांचेही शोषण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 'ऑफिस बॉय' ते 'मास्टरमाइंड' असा नीरजचा प्रवास या प्रकरणाला अधिक गंभीर बनवत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरातच्या पापांच्या घडा फोडणारा नीरज समोर, 58 सीसीटीव्ही फुटेज चोरणाऱ्या ऑफिस बॉयचा फोटो
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement