स्टंटबाजी नडली! पुलावरून वेगात पाणी वाहत असतानाही तरुणाने घेतली रिस्क, पुढे घडलं भयंकर, VIDEO व्हायरल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Buldhana Weather Update: बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याचे पाहायला मिळत आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: मागील तीन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील पावसानं थैमान घातलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याचे पाहायला मिळत आहे.
चिखली तालुक्यातील हातनी येथील पूल देखील पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पुराचं पाणी वेगाने वाहत आहेत. अशात या पुलावरून पाणी वाहत असताना एका तरुणाने स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने पुराच्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची ही स्टंटबाजी चांगलीच अंगलट आली. पुरातून बाईक काढण्याचा प्रयत्न करणारा युवक थोडक्यात बचावला आहे.
advertisement
स्थानिकांनी समय सूचकता दाखवत त्याला ओढून पाण्याबाहेर काढल्याने या तरुणाचे प्राण वाचले आहे. पुराच्या पाण्यातून हा युवक मार्ग काढण्याचा जीवघेणा प्रयत्न करत होता. मात्र पुराच्या पाण्यात दुचाकी टाकताच त्याचा दुचाकी वरील ताबा सुटला आणि दुचाकी वाहून जाऊ लागली. मात्र त्याला दुचाकीचा मोह आवरत नव्हता. संबंधित तरुण जीव धोक्यात घालून दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
advertisement
स्टंटबाजी नडली! पुलावरून वेगात पाणी वाहत असतानाही तरुणाने घेतली रिस्क pic.twitter.com/7nS7f0mB3d
— News18Lokmat (@News18lokmat) August 19, 2025
दरम्यान, त्याचा हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली. अशात स्थानिकांनी या युवकाला धरून पुराच्या पाण्याबाहेर काढले. पण त्याच्या या स्टंटबाजीमुळे त्याची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
August 19, 2025 2:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्टंटबाजी नडली! पुलावरून वेगात पाणी वाहत असतानाही तरुणाने घेतली रिस्क, पुढे घडलं भयंकर, VIDEO व्हायरल


