Gunratan Sadavarte : सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, कारवर दगडफेक, मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Attack on Adv Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मराठा आरक्षण आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना वेळीच ताब्यात घेतले.
जालना: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मराठा आरक्षण आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना वेळीच ताब्यात घेतले. सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कारवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून वातावरण काही वेळ तणावपूर्ण झाले होते.
मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीतून विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि इतर आंदोलकांवर टीका केली आहे. हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्यादेखील संविधानविरोधी असल्याची भूमिका सदावर्ते यांनी मांडली आहे. त्यावरून मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये त्यांच्याविरोधात रोष आहे.
advertisement
नेमकं घडलं काय?
जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲडॉ. गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे आले होते. यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताब्यावर मराठा समाज बांधवांनी दगडफेक करत हल्ला केला. यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तात्काळ पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. या गोंधळा नंतर सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषण स्थळी रवाना झाले आहे.
advertisement
दरम्यान, जालन्यात ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच अटकाव करत मराठा आरक्षण आंदोलकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आता त्यांची चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे अशा हल्ल्यांना आपण घाबरत नसल्याचे सदावर्ते यांनी म्हणत जालन्यातील धनगर बांधवांच्या उपोषण स्थळी भेट दिली. आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी धनगर बांधवांनी उपोषण सुरू केले आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 21, 2025 2:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gunratan Sadavarte : सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, कारवर दगडफेक, मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक