मोबाईल आणि डिजिटल गोष्टी नकोच! विद्यार्थ्यांसाठी संस्थेने सुरू केला विशेष उपक्रम
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
विद्यार्थ्यांची तासिका नसते किंवा खेळाचा तास असतो तेव्हा विद्यार्थी वाचनासाठी येतात. काही विद्यार्थी तर सकाळी शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतरही वाचन कट्ट्यावर हजेरी लावतात.
छत्रपती संभाजीनगर : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थी मोबाईलसारख्या डिजिटल गोष्टींपासून दूर राहावेत, यासाठी वाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सरस्वती भुवन या संस्थेने संस्थांतर्गत विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा सुरू केला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला याबाबत मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा वाचन कट्टा सुरू करण्यात आलेला आहे. संस्थेची सर्व महाविद्यालयं आणि विद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सरचिटणीस देशपांडे यांनी स्वत: या उपक्रमाचं उद्घाटन केलं.
मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ म्हणाले की, वाचन कट्टा सुरू झाल्यापासून सर्वच विद्यार्थी अगदी आवडीने या ठिकाणी येऊन वर्तमानपत्र वाचतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्रे, मासिकं आणि इतरही पुस्तकं ही ठेवण्यात आली आहेत. ज्यावेळी विद्यार्थ्यांची तासिका नसते किंवा खेळाचा तास असतो तेव्हा देखील विद्यार्थी वाचनासाठी येतात. काही विद्यार्थी तर सकाळी शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतरही वाचन कट्ट्यावर हजेरी लावतात.
advertisement
"या ठिकाणी आम्हाला छान पुस्तकं वाचायला मिळत आहेत. मी इयत्ता दहावीमध्ये शिकतो. दहावीचा अभ्यास करून डोक्यावर ताण येतो. ताण आल्यानंतर मी इथे येऊन छान कॉमिक्स किंवा गोष्टीचे पुस्तक वाचतो. त्यामुळे मला छान वाटतं," अशी प्रतिक्रिया अथर्व नावाच्या विद्यार्थ्याने दिली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Aug 12, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
मोबाईल आणि डिजिटल गोष्टी नकोच! विद्यार्थ्यांसाठी संस्थेने सुरू केला विशेष उपक्रम






