छत्रपती संभाजीनगर हादरलं! वाढदिवसामुळे मामाच्या घरी आले अन् मामीवर केला अत्याचार, मामाचाही सहभाग
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Crime : देवळाई परिसरातील या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. विवाहित महिला, तिचा पती आणि दोघे भाचे यांच्या गंभीर आरोपांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरात एका विवाहितेवर पती आणि दोन भाच्यांकडून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरात आलेल्या भाच्यांसोबत पतीने तिला दारू पाजून जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हा प्रकार जुलै 2024 पासून ते मे 2025 पर्यंत सुरूच राहिल्याचे तिच्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणातील गुन्हा सुरुवातीला नवी मुंबई येथे दाखल झाला होता; त्यानंतर तो चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
30 वर्षीय महिला देवळाई भागात राहते. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला पतीचे दोघे भाचे (यापैकी एक अल्पवयीन) घरी आले होते. त्या दिवशी पतीने पत्नीला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर दोन्ही भाच्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराचा एका भाच्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्या आधारे तिला धमकावून शांत बसवले, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ही माहिती उघड करत तिने नवी मुंबईत तक्रार दाखल केली होती.
advertisement
दरम्यान, या प्रकरणाला दुसरी बाजूही पुढे आली आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन भाच्याने सप्टेंबरमध्ये तक्रार दिली होती की, मामीने त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यान्वये मामीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढे हा प्रकार पतीच्या लक्षात आला आणि भाच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली.
advertisement
या दोन्ही तक्रारीनंतर प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप होत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समाधान पवार करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 9:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
छत्रपती संभाजीनगर हादरलं! वाढदिवसामुळे मामाच्या घरी आले अन् मामीवर केला अत्याचार, मामाचाही सहभाग


