Chhatrapati Sambhajinagar : परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न फसले! दोन अभियंत्यांना 4 लाखांचा गंडा; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाला अटक
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Job Fraud News : छत्रपती संभाजीनगर येथील घटना चर्चेत आलेली आहे. रोमानियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेली आहे.
छत्रपती संभाजीनगर : परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन अभियंत्यांकडून 4 लाख 30 हजार रुपये घेऊन फरार झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 28 वर्षांचा एमबीए विद्यार्थी अक्षय रामलू कल्याण जो आंबेडकर चौकातील ए.आर. के. अँब्रॉड जॉब प्लेसमेंट चालवत होता त्याला सिडको पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
नेमके प्रकरण काय?
अभियंता विपिन लेकुरवाळे आणि त्याचा मित्र सचिन नारायण मांगे, जे 2016 पासून शेंद्रयात कंपनीत काम करत होते त्यानंतर ते 2024 फेब्रुवारीमध्ये नोकरीच्या शोधात होते. त्यांना अॅजन्सीबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपी अक्षयची भेट घेतली. अक्षयने रोमानियात मेकॅनिकल अभियंत्यांच्या जागा असल्याचे सांगून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली.
advertisement
एप्रिलमध्ये दोघांनी अक्षयसोबत लेखी करार केला आणि ऑनलाइन 4 लाख 30 हजार रुपये पाठवले.मात्र, पैसे दिल्यानंतर अक्षय नेहमीच वादग्रस्त आणि अस्पष्ट उत्तर देत राहिला. काही महिन्यांनंतर तो अचानक म्हणाला की रोमानियाऐवजी तुम्हाला मोल्दोव्हा देशात पाठवावे लागेल. पण तेथे फक्त स्टुडंट व्हिसावर जावे लागेल.
अशा प्रकारे अक्षय सतत वेळ घालवत राहिला. यावेळी दोघेही सतत त्याच्या कार्यालयावर जाऊन सतत विचारणार करत राहिले. पण तो नोकरी देण्याची कोणतीही खात्री न देता उलट त्या अभिंयत्याना धमक्या देऊ लागल्या तसेच पैसे परत न देणे असे प्रकार सुरु झाले. अखेर त्यांनी थेट सिडको पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
advertisement
पोलिस कारवाई सुरु
उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि अक्षयला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेतून स्पष्ट होते की, परदेशात नोकरी मिळवण्याच्या हट्टापाई काही फसवणूक करणारे लोक मोठ्या प्रमाणावर गंडा घालू शकतात. तरुणांनी अशा परिस्थितीत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. विदेशात नोकरीच्या आकर्षक जाहिरातींमध्ये पैसे पाठवण्याआधी सत्यता तपासणे आणि अधिकृत स्त्रोतांमार्फतच अर्ज करणे आवश्यक आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 12:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न फसले! दोन अभियंत्यांना 4 लाखांचा गंडा; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाला अटक