Chhatrapati Sambhajinagar : खाद्यतेलाच्या नावाखाली विष विक्री; FDA च्या धडक कारवाईने उघड झालं मोठं रॅकेट

Last Updated:

Maharashtra Food Safety Action : महाराष्ट्रात अन्न-औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्यतेल आणि इतर पदार्थांवर मोठी कारवाई केली. या छाप्यात तब्बल 42294 किलो साठा जप्त करण्यात आला असून अन्नभेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या हंगामात खाद्यतेलात भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ऑगस्टपासून तीव्र मोहीम हाती घेतली. या कारवाईत आतापर्यंत 42294 किलो भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
कारवाईत याशिवाय भगर, मिरची पावडर, मसाले आदी पदार्थांचेही सुमारे 5122 किलो साठे हस्तगत झाले. एकूण जप्त मालाची किंमत 92 लाख 96 हजार 760 रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांनी दिली. सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा’ या विशेष अभियानांतर्गत 11 ऑगस्टपासून ही मोहीम सुरू आहे. यात खाद्यतेल: 42294 किलो किंमत 84 लाख 45 हजार 537 रुपये आहे.
advertisement
भगर, मिरची पावडर, मसाले इ. 5122 किलो किंमत 6 लाख 23 हजार 426 रुपये आहे.‎‎ भेसळीचे प्रकारमहागड्या तेलात स्वस्त तेल मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते. उदाहरणार्थ:  शेंगदाणा तेलात सोयाबीन किंवा पामोलीन तेल  सूर्यफूल तेलात सोयाबीन तेल सोयाबीन तेलात पामोलीन तेल मिसळून ग्राहकांना फसवले जाते.
डब्यातले तेल हे नेहमीच वजन करुन घ्यावे, बऱ्याचदा कमी तेल त्यात दिले जाते. ‎‎ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचनातेलाचा डबा घेताना ‘बेस्ट बिफोर’ तारीख तपासा.  ‎डबा पूर्णपणे सीलबंद आहे ना हे पाहा.  ‎ब्रँड, डब्याची नवीनता याची खात्री करा.  ‎वजन तपासून घ्या  अनेकदा कमी प्रमाणात तेल दिले जाते.  ‎शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधा. ‎विनामूल्य हेल्पलाईन: 1800112100‎‎ग्राहक सतर्क राहिल्यास भेसळ रोखणे शक्य आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.‎‎
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : खाद्यतेलाच्या नावाखाली विष विक्री; FDA च्या धडक कारवाईने उघड झालं मोठं रॅकेट
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement