मोठी घोषणा! आता थेट छत्रपती संभाजीनगरातून करता येणार आतरराष्ट्रीय उड्डाण; तयारी जोरात सुरू

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर विमानतळावर थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकरच सुरू होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी तयारी जोरात सुरू असून विमानतळाचे विस्तारकाम आणि आधुनिक सुविधा जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चिकलठाणा विमानतळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; 139 एकर भूसंपादनाला 82.87 कोटी मंज
चिकलठाणा विमानतळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; 139 एकर भूसंपादनाला 82.87 कोटी मंज
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा रखडलेला प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आला आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या 139 एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला 87 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम आता प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे विस्तारीकरण चिकलठाणा, मुर्तीजापूर आणि मुकुंदवाडी परिसरातील सुमारे 56.25 हेक्टर क्षेत्रात होणार आहे. याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये शासनाने जमीनसंपादनासह सुमारे 578 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. निधी उपलब्ध झाल्याने जानेवारी 2026 पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या विमानतळाची धावपट्टी 9,300 फूट लांबीची असून ती अपुरी ठरत होती. विस्तारीकरणानंतर धावपट्टीची लांबी वाढणार असून मोठ्या तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची ये-जा शक्य होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना थेट विमानसेवेचा लाभ मिळणार असून वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
advertisement
विमानतळ विस्तारामुळे उद्योग व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीसह अनेक मोठ्या उद्योगांच्या पूरक कंपन्या येथे येण्याची शक्यता असून शहराची देश-विदेशाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. परिणामी गुंतवणूक, रोजगार आणि पर्यटन वाढून मराठवाड्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे.
विमानतळ विस्तारामुळे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे येणार आहे. देशातील व परदेशातील सुमारे 80 हून अधिक मोठ्या कंपन्यांचा कच्चा माल थेट येथे पोहोचू शकेल. त्याचबरोबर ड्रायफ्रूटसह विविध मालाची निर्यात सुलभ होणार असल्याने स्थानिक उद्योगांना मोठा फायदा होईल. ही संधी शहरासाठी मैलाचा दगड ठरणार असून, आता मराठवाडा उद्योगांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर जाईल अशी प्रतिक्रिया मसिआचे माजी अध्यक्ष चेतन राऊत यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
मोठी घोषणा! आता थेट छत्रपती संभाजीनगरातून करता येणार आतरराष्ट्रीय उड्डाण; तयारी जोरात सुरू
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement