Ch. Sambhajinagar Mahapalika: संभाजीनगर मनपात विविध पदांसाठी भरती, शेवटची तारीख कोणती; लगेचच करा अप्लाय
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये नोकरभरती सुरू आहे. अलीकडेच या ऑनलाईन भरतीची शेवटची तारीख पुढे ढकलली आहे. जर तुम्ही अजूनही अर्ज नसेल भरला तर, तात्काळ भरा.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Munciple Corporation Recruitment) नोकरभरती सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच संभाजीनगर महापालिकेच्या (Chhatrapati Sambhajinagar Munciple Corporation) नोकरभरतीची जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली होती. नुकतीच या ऑनलाईन भरतीची शेवटची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये ऑनलाईन अर्ज नसेल भरला, तर आत्ताच भरून टाका. कोणकोणत्या रिक्त पदांसाठी नोकरभरती होणार आहे, जाणून घेऊया...
रिक्त पदे
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये, 222 रिक्त पदांसाठी नोकरभरती होणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी 32 रिक्त जागा, उपअग्निशमन केंद्र अधिकारी पदासाठी 04 रिक्त जागा, सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी 1 रिक्त जागा, स्थापत्य अभियांत्रिकी किंवा अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण निरीक्षक पदासाठी 24 रिक्त जागा, स्वच्छता निरीक्षक पदासाठी 12 रिक्त जागा, पशुधन पर्यवेक्षक पदासाठी 7 रिक्त जागा, चालक-यंत्रचालक (Driver Operator) पदासाठी 15 रिक्त जागा, उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक पदासाठी 6 रिक्त जागा, अनुलेखक (ट्रेसर) पदासाठी 9 रिक्त जागा, अग्निशामक पदासाठी 100 रिक्त जागा आणि रोखपाल पदासाठी 12 रिक्त जागा असणार आहेत.
advertisement
शैक्षणिक पात्रता
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवीची आवश्यकता आहे.
- उपअग्निशमन केंद्र अधिकारी पदासाठी स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire) पदवीची आवश्यकता आहे.
- सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक अशा या पात्रतेची आवश्यक आहे.
- स्थापत्य अभियांत्रिकी किंवा अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण निरीक्षक पदासाठी स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा विषय उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक अशा या पात्रतेची आवश्यक आहे.
- स्वच्छता निरीक्षक पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण अशा या पात्रतेची आवश्यकता आहे.
- पशुधन पर्यवेक्षक पदासाठी 12वी उत्तीर्ण, पशुसंवर्धन डिप्लोमा आणि त्या विभागात 02 वर्षांचा अनुभव अशा पात्रतेची आवश्यकता आहे.
- चालक-यंत्रचालक (Driver Operator) पदासाठी 10वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, जड वाहन चालक परवाना आणि जड वाहन चालवण्याचा 03 वर्षांचा अनुभव अशा पात्रतेची आवश्यकता आहे.
- उद्यान सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक पदासाठी B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर, बॉटनी किंवा फॉरेस्ट्री विषयात पदवी सोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी, सोबतच संबंधित पदासाठीचे 03 वर्षांचा अनुभव अशा पात्रतेची आवश्यकता आहे.
- अनुलेखक (ट्रेसर) पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि ITI (Tracer/Draftsman) या पदवीची पात्रतेसाठी आवश्यकता आहे.
- अग्निशामक पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि अग्निशमन प्रशिक्षण कोर्स या पदवीची आवश्यकता आहे.
- रोखपाल पदासाठी B.Com आणि संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. या पदवीची आवश्यकता आहे.
advertisement
भरतीच्या जाहिरातीची ऑनलाईन PDF
वयोमर्यादा
छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये होत असलेल्या भरतमध्ये 18 ते 40 वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्जदारांचे नमूद करण्यात आलेले वय पूर्ण असायला हवे. मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटक या उमेदवारांना 05 वर्षांसाठी सूट असणार आहे.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी किंवा अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण निरीक्षक पदासाठी, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक, अनुलेखक (ट्रेसर) आणि रोखपाल पदासाठी 18 ते 38 वर्षे वयाची अट असणार आहे.
- उपअग्निशमन केंद्रच्या पदासाठी 40 वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे.
- चालक-यंत्रचालक (Driver Operator) आणि अग्निशामक पदासाठी 30 वर्षांपर्यंत वयाची अट असणार आहे.
advertisement
ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक
नोकरीचं ठिकाण छत्रपती संभाजीनगर असणार आहे. खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रूपये परिक्षा शुल्क असणार आहे. तर, अनाथ किंवा मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना 900 रूपये परिक्षा शुल्क असणार आहे. 31 मार्च 2026 ही तारीख ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन परिक्षा शुल्क भरण्याची तारीख आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 8:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Ch. Sambhajinagar Mahapalika: संभाजीनगर मनपात विविध पदांसाठी भरती, शेवटची तारीख कोणती; लगेचच करा अप्लाय










