Sambhajinagar Accident : घरी वाट पाहत होतं कुटुंब, पण वाटेतच घात झाला; 2 भीषण अपघातांनी महाराष्ट्र हादरला
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Shocking Accident News : वैजापूरमध्ये मंगळवारी दोन भीषण अपघात घडले.नेमका अपघात कसा घडला ते पाहूयात.
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यात मंगळवारी पुन्हा एक अपघात घडला. हा अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर माहिती समोर आली आहे. यामध्ये गाडी पलटी झाली आणि अनेक जण जखमी झालेत. घटनास्थळी तातडीने मदत पोहोचवण्यात आली असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर 'जरूळ फाट्या'जवळ घडली. झालं असं की, एक पिकअप गाडी भरधाव जात असताना अचानक त्या गाडीचं टायर निखळलं अन गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीतले दहा जण जखमी झालेत, त्यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आलंय.
तर दुसरी घटना ही (दि.13) रात्री दोनच्या सुमारास शहरातल्या येवला रोडवर दुसरा भीषण अपघात मंगळवारी झाला. यात जालना जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या लाख खंडाळा भागात राहणारे प्रदीप बाजीराव गोतीस (वय 40) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना गाडीवरचा ताबा सुटला अन त्यांची गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की प्रदीप गोतीस यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
खंबाळा येथून कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे अद्रक काढणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी (एमएच 06 एजी 4493) 25 हून अधिक मजुरांना घेऊन निघाली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गाडी 'जरूळ फाट्या'जवळ आली असताना अचानक धावत्या वाहनाचं मागचं टायर फुटलं आणि थेट गाडीपासून वेगळं होऊन बाहेर फेकलं गेलं. वेग जास्त असल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली ही पिकअप रस्त्यावरच पलटी झाली.
advertisement
जखमींवर उपचार सुरू
या अपघातात पिकअपमधील प्रियांका पवार (वय 18 वर्षे), काजल मोरे (16), मोनाली मोरे (28), सुवर्णाबाई मोरे (30), यशवंत मोरे (80), काशीनाथ धीवर (27), इंदर पवार (18), बाळू मोरे (45), वसीम शेख (34) आणि ज्योती मोरे (32) हे जखमी झाले. सर्व जण वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील रहिवासी आहेत. जखमींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 9:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Sambhajinagar Accident : घरी वाट पाहत होतं कुटुंब, पण वाटेतच घात झाला; 2 भीषण अपघातांनी महाराष्ट्र हादरला










