Chhatrapati Sambhajinagar Crime : कानाच्या उपचारासाठी घरातून निघाली अन् गळा चिरलेल्या अवस्थेत अढळली; विवाहित महिलेसोबत भयंकर घडलं
Last Updated:
Ladsavngi News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा खून करण्यात आलेला असून तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळालेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : कान दुखत असल्याने उपचारासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागेल असा कोणालाही अंदाज नव्हता. पण काही तासांतच तिचा मृतदेह डोंगरात सापडला आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरून गेले आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना छत्रपती संभाजीनगरच्या लाडसावंगी येथील आहे. जिथे राहत असलेल्या कांताबाई सोमदे (वय45) यांचा खून करण्यात आलेला आहे. काही दिवसांपासून कांताबाईंचा कान दुखत होता त्यामुळे त्या गुरुवार ( ता.30) रोजी घरच्यांना सांगून घाडी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या. परंतू सकाळी गेलेली महिला पुन्हा घरात न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर शुक्रवारी त्यांच्या मुलाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.
advertisement
महिलेचा संशयास्पद खून...
कांताबाई यांच्या मुलाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याबाबत लगेच पोलिसांचे पथक तयार केले आण त्यांचा शोध सुरु केला. पोलिसांच्या अथक शोधानंतर महिला ही अंजनडोहच्या वन विभागाच्या डोंगरात सापडली. मात्र या महिलेचा खुन करण्यात आलेला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar Crime : कानाच्या उपचारासाठी घरातून निघाली अन् गळा चिरलेल्या अवस्थेत अढळली; विवाहित महिलेसोबत भयंकर घडलं


