advertisement

Baba Siddique: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवी घडामोड, मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, कोणाला दिली क्लिनचीट?

Last Updated:

Baba Siddique: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मोठा दावा केला आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवी घडामोड, मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, कोणाला दिली क्लिनचीट?
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवी घडामोड, मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, कोणाला दिली क्लिनचीट?
मुंबई: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मोठा दावा केला आहे. या हत्येमागे 'बिल्डर लॉबी'चा हात असल्याच्या चर्चांना मुंबई पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. "सिद्दीकी यांच्या हत्येशी बिल्डर लॉबीचा कोणताही संबंध नसल्याचे" प्रतिज्ञापत्र पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. संबंधित आरोप हे केवळ तर्क-कुतर्कांवर आधारित असल्याचे पोलिसांनी यात नमूद केले आहे.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या रात्री वांद्रे (पूर्व) येथे तत्कालीन आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली असून, बिश्नोई टोळीच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या ही अभिनेता सलमान खानसोबत असलेल्या जवळीकीमुळेच बिष्णोई टोळीने केली असल्याची चर्चा होती. तर, सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात बिल्डर लॉबीवरही संशय व्यक्त केला होता.
advertisement

मुंबई पोलिसांनी काय म्हटले?

पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले की, ही हत्या अनमोल बिश्नोईच्या टोळीने केली आहे. दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी विश्वात वर्चस्व प्रस्थापित करणे आणि खंडणी वसूल करणे हाच या हत्येमागचा मुख्य उद्देश होता.
तपासादरम्यान कोणत्याही बिल्डरचा किंवा विकासकाचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील (SRA) वादातून ही हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला आहे.
advertisement
बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तपास 'अपूर्ण' असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सहाय्यक पोलीस आयुक्त (सीआयडी) किशोरकुमार शिंदे यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.

पत्नीचे आरोप पोलिसांनी फेटाळले, 'यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्यासाठी...'

शहझीन सिद्दीकी यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला होता की, वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये रस असलेल्या काही 'वजनदार' बिल्डरांची चौकशी पोलिसांनी केलेली नाही. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप 'तथ्यहीन' असल्याचे म्हटले आहे.'पोलिस यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. संपूर्ण तपास हा तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने करण्यात आला आहे," असे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baba Siddique: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवी घडामोड, मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, कोणाला दिली क्लिनचीट?
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement