मुंबई-नवी मुंबई आता मिनिटांच्या अंतरावर, मेट्रो 5 आणि 12 चा मेगा विस्तार; पाहा कुठे येणार नवीन स्टेशन?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मेट्रो 5 ही बदलापूर पर्यंत आणि दुर्गाडी मार्गे टिटवाळ्यापर्यंत या मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकांच्या या विस्तारामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरातून मेट्रो धावणार आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य उपस्थितीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
कल्याण तळोजा मेट्रो 12 , ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 यांचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी मार्गिका विस्तार प्रस्ताव मांडत याबाबत एमएमआरडीएला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आता मेट्रो 12 ही कळवा मुंब्रा येथे जाणार आहे. तर मेट्रो 5 ही बदलापूर पर्यंत आणि दुर्गाडी मार्गे टिटवाळ्यापर्यंत या मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकांच्या या विस्तारामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरातून मेट्रो धावणार आहे.
advertisement
कल्याण पलीकडच्या शहरातील नागरिकांना थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठण्यासाठी एक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे तर या मार्गाला बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली तसेच पुढील सर्व शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाची जोडणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 ची विस्तारित मार्गिका 5 अ दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे.
advertisement
याबाबत एमएमआरडीएकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. तर मेट्रो 5 ब ही मेट्रो मार्गिका चिखलोली रेल्वे स्थानकापासून थेट बदलापूर पर्यंत नेण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. तर दुर्गाडी येथून थेट टिटवाळा पर्यंत जाण्यासाठी 5 क मेट्रो मार्गिका उभारण्यासाठीही आराखडा तयार करण्यात यावा. अशा सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. या दोन्ही मार्गिका झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि कल्याण पलीकडच्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबई, मुंबई गाठण्यासाठी विविध मेट्रो मार्गिका उपलब्ध असतील. याबाबत एमएमआरडीए आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि प्रवासाबद्दल नागरिकांना दिलासा मिळेल.
advertisement
ठाणे जिल्ह्यातील या शहरात होणार डबल डेकर मार्ग
कल्याण तळोजा मेट्रो 12, कांजूरमार्ग - बदलापूर मेट्रो 14, तसेच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5, दुर्गाडीमार्गे कल्याण- उल्हासनगर अंबरनाथ चिखलोली येथे जाणारी 5, शिळफाटा रांजणोली उन्नतमार्ग, वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग हे सर्व वाहतूक प्रकल्प डबल डेकर पद्धतीने उभारण्यात येणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 11:08 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
मुंबई-नवी मुंबई आता मिनिटांच्या अंतरावर, मेट्रो 5 आणि 12 चा मेगा विस्तार; पाहा कुठे येणार नवीन स्टेशन?










