advertisement

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता? राष्ट्रवादीच्या खासदाराला वेगळाच संशय, मोठा गौप्यस्फोट समोर

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर याबाबतचे नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर याबाबतचे नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. याबाबत चौकशी अहवाल देखील समोर येत आहेत. दरम्यान, आता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगळाच संशय घेतला आहे. अजित दादांच्या विमानात बॉम्ब होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय दादांचं विमान जमीनीला टेकण्याआधीच विमानात स्फोट झाला, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
advertisement
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर भाष्य करताना बजरंग सोनवणे म्हणाले की, "या अपघात संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. या अपघातात संशय घ्यायला जागा आहे. देवगिरी बंगला ते विमानतळ सगळे व्हिडिओ फुटेज तपासले पाहिजे. जमिनीला विमान टेकायच्या अगोदर स्फोट झाला. त्याच्यात बॉम्ब होता का? इंधनाचा स्फोट झाला की विमानांत बिघाड झाला होता? याचे सगळे डिटेल्स पुढे आले पाहिजेत, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली.
advertisement
या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. देशातील उच्च तपासणी यंत्रणानी तपास करावा. अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. अजित दादा कोणत्या गाडीने देवगिरी वरून विमानतळावर पोहोचले. कधी पोहचले. याचे CCTV व्हिडीओ तपशील मिळाला पाहिजे. जमिनीवर येण्याअगोदरच विमान क्रॅश झालं. त्यानंतर आणखी 2 ते 3 स्फोट झाले, असंही खासदार म्हणाले. बजरंग सोनवणे यांच्या या वक्तव्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता? राष्ट्रवादीच्या खासदाराला वेगळाच संशय, मोठा गौप्यस्फोट समोर
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement