advertisement

धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात, एकजण जागेवरच गेला

Last Updated:

बीड शिरूर रोडवरील अपघातात धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात झाला. या अपघातात एक जण जागेवरच गेला.

बीड अपघात
बीड अपघात
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना बीड ते शिरूर रोडवर रायमोह जवळ घडली.
कृष्णा मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धुलीवंदनाचा सण साजरा करायला वॉटर पार्कला जात होता. मध्यरात्री त्यांची गाडी बीड ते शिरूर रोडवरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला पलट्या खात थेट एका विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली.
सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही. परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा जागीच ठार झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण यामध्ये जखमी झाले. या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक गाडी होती त्या गाडीतील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात, एकजण जागेवरच गेला
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement