Beed Crime : बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात मोठा राडा, लाथा बुक्यांनी मारहाण, रात्री 11 वाजता काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed Tamasha Rada Video : रात्री 11 वाजता हा कार्यक्रम सुरू असताना सुधीर प्रकाश वैरागे नामक तरूणाला एका टोळक्याकडुन लाकडी काठ्या आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आली
Beed Crime News : Beed Crime News : तमाशा कलावंतांसाठी बीड एकेकाळी मोठी पर्वणी होती. मात्र आता याच बीडमध्ये तमाशा नाशवंत होत चाललाय. थोड्या दिवसांपूर्वी तमाशातील महिलेच्या नादाला लागून 45 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अशातच आता बीडमध्ये तमाशाच्या फड आला असताना कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालंय.
टोळक्याकडुन लाथा बुक्क्याने मारहाण
बीडच्या केज तालुक्यातील सोनीजवळ येथे म्हसोबा यात्रेच्या निमित्त तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 11 वाजता हा कार्यक्रम सुरू असताना सुधीर प्रकाश वैरागे नामक तरूणाला एका टोळक्याकडुन लाकडी काठ्या आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये तरूण गंभीररित्या जखमी झाला असुन अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात मोठा राडा, लाथा बुक्क्यांनी मारहाण pic.twitter.com/RxaQl2N9ZM
— News18Lokmat (@News18lokmat) December 24, 2025
अद्याप गुन्हा दाखल नाही
बीडमध्ये एवढा मोठा राडा झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले असताना देखील पोलीसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली नाही. अचानक सुधीर प्रकाश वैरागे नावाच्या तरूणाला एका टोळक्याकडून लाकडी काठ्या आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, या घटनेमध्ये तरूण गंभीररित्या जखमी झाला असून अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. तर गुन्हा दाखल करू नये म्हणून या प्रकरणात नेमकं कोण पोलिसांवर दबाव टाकत आहेत? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात मोठा राडा, लाथा बुक्यांनी मारहाण, रात्री 11 वाजता काय घडलं?











