Beed Crime : आईच्या चारित्र्यावर घेतला संशय; अल्पवयीन मुलाने बापाला शेतात गाठलं अन्.. बीड जिल्हा हादरलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Beed Crime : आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या जन्मदात्या बापाचा कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाने हत्या केल्याची घटना घडली.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 18 ऑगस्ट : गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अशा घटना घडल्या आहेत, ज्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशीच आणखी एक घटना समोर आल्याने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा राग अनावर झाल्याने अल्पवयीन मुलाने जन्मदात्या बापाला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरुन मुलाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील शमीमबी जानुखाँ पठाण (वय 42) यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलिसांत गुन्हादाखल झाला. मृत पती जानुखाँ पठाणला दारूचे व्यसन होते. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. 16 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी असताना मोठा मुलगा साहिलने वडिलांना फोन करून जेवणासाठी विचारले असता त्यांनी शेतात डबा घेऊन येण्यास सांगितले. साहिलने लहान भावामार्फत डबा पाठवला. रात्री दीडच्या सुमारास लहान मुलगा घरी आला व आपण वडिलांचा कुऱ्हाडीने वार केल्याचे त्याने आई व मोठ्या भावाला सांगितले.
advertisement
शेतात जाऊन पाहिले असता वडील शेतात रक्ताच्या थोरळ्यात पडलेले दिसले. साहेब पठाण यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरपंचाने बर्दापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला. सकाळी 7 वाजता चौकशीसाठी बोलवलेल्या चौघांपैकी एका त्यांच्याच मुलाने खून केल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले. अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक कवितानेरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महिंद्रसिंग ठाकूर हे करत आहेत.
advertisement
वाचा - Breaking news : पुण्यात गँगवार सुरूच; दोन गटात जोरदार राडा, एकाची हत्या
view commentsआईच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा राग मनात धरून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जन्मदात्या बापाचा खूण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या आंबेजोगाई जवळील पुस गावात उघडकीस आली. जानुखाँ पठाण (वय ४२) असे मयताचे नाव आहे. साहिल पठाण हा जेवणाचा डब्बा देण्यासाठी शेतात गेला त्यावेळी वडिलांनी परत मारहाण करायला सुरुवात केली नेहमीच्या त्रासाला कंटाळून कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यात, चेहऱ्यावर व मानेवर वार केले यात जागीच मृत्यू झाला.मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन अल्पवयीन मुलाविरुद्ध बर्दापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2023 3:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : आईच्या चारित्र्यावर घेतला संशय; अल्पवयीन मुलाने बापाला शेतात गाठलं अन्.. बीड जिल्हा हादरलं


