Breaking news : पुण्यात गँगवार सुरूच; दोन गटात जोरदार राडा, एकाची हत्या
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पुण्यात पुन्हा एकदा गँगवार उफाळून आलं आहे. दोन गटात तुफान राडा झाला आहे.
पुणे, 18 ऑगस्ट, वैभव सोनवणे : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे, पुण्यात पुन्हा एकदा गँगवार उफाळून आलं आहे. दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. शहारातील वानवडी परिसरातील ही घटना आहे. या हाणामारीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांतील टोळक्याकडून झालेल्या हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून दहशतीचं वातावरण आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की पुण्यात दोन गटात तुफान राडा झाला आहे. टोळक्याकडून झालेल्या मारहाणीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची हत्या झाली आहे. पुण्यातील वानवडी परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चार दिवसांपूर्वी तरुणाची हत्या
दरम्यान चार दिवसांपूर्वी पुण्यातून अशीच एक घटना समोर आली होती. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंगला टॉकीज समोर टोळक्याकडून तरुणाची हत्या करण्यात आली. नितीन मोहन म्हस्के असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. मंगला टॉकीजला नितीन चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी टोळक्याने त्यात्यावर हल्ला करून त्याची हत्या केली.
advertisement
नितीन म्हस्केवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच प्रकरणात झालेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुण्यात गेल्या चार दिवसांत अशा पद्धतीनं दोन खूनाच्या घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
August 18, 2023 8:28 AM IST


