दोन मैत्रिणी, दोघी विवाहित, तरीही एकाच तरुणावर जडलं प्रेम, बीडमध्ये लव्ह ट्रँगलमधून होमगार्ड मैत्रिणीचा भयानक शेवट

Last Updated:

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका महिलेनं प्रेमाच्या त्रिकोणातून आपल्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे.

News18
News18
बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका महिलेनं प्रेमाच्या त्रिकोणातून आपल्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे. आरोपी महिलेनं पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने मैत्रिणीचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरून स्कूटीवरून शहराच्या बाहेर नेऊन टाकला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अयोध्या राहुल व्हरकटे असं हत्या झालेल्या २६ वर्षीय महिलेचं नाव आहे. ती होमगार्ड म्हणून काम करत होती. शिवाय ती पोलीस भरतीची देखील तयारी करत होती. तर वृंदावनी सतीश फरताळे असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. मयत आयोध्या आणि वृंदावनी दोघीही विवाहित आहेत. अयोध्याच्या पतीचं ३ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तेव्हापासून ती माहेरी गेवराई इथं वास्तव्याला होती. तिला एक मुलगा असून तो सासरी राहतो. काही दिवसांपूर्वी अयोध्याची वृदांवनीशी ओळख झाली होती.
advertisement
आरोपी वृंदावनी ही बीडमध्ये आपल्या तीन मुलांसह राहते. तिचा पती गावी असतो. तिचे बीडमधील एका तरुणासोबत अनैतिक प्रेम संबंध सुरू होते. ही बाब अयोध्याला माहीत होती. काही दिवसांपूर्वी अयोध्या हिचेही त्याच तरुणासोबत सूत जुळलं. आपल्या प्रियकरासोबत मैत्रिणीचेच प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती वृंदावनीला मिळाली. यानंतर दोघींमध्ये वाद होऊ लागले. यातून वृंदावनीने अयोध्याची हत्या करण्याच कट रचला.
advertisement
घटनेच्या दिवशी १९ ऑगस्टला आरोपी वृंदावनीने होमगार्ड असलेल्या अयोध्याला आपल्या घरी बोलावलं. यावेळी वृंदावनीचे तिन्ही मुलं शाळेत गेली होती. अयोध्या घरी आल्यानंतर वृंदावनीने तिची हत्या केली. तसेच मुलं शाळेतून घरी यायच्या आधी तिने अयोध्याच्या मृतदेह एका मोठ्या बॉक्समध्ये भरला. यानंतर आपल्या १४ वर्षांच्या मुलाच्या मदतीने तो बॉक्स शहराबाहेर नेऊन टाकला.
advertisement
या प्रकरणी अयोध्याच्या भावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता अयोध्याच्या एका मैत्रिणीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांना वृंदावनीवर संशय बळावला. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, १९ तारखेला वृंदावनी आरोपी महिलेच्या घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली. मात्र ती घरातून बाहेर पडल्याचं दिसलं नाही. शिवाय आरोपी महिला एक मोठा बॉक्स घेऊन घराबाहेर जात असल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
दोन मैत्रिणी, दोघी विवाहित, तरीही एकाच तरुणावर जडलं प्रेम, बीडमध्ये लव्ह ट्रँगलमधून होमगार्ड मैत्रिणीचा भयानक शेवट
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement