Bhagur NagarParishad election 2025 : सावरकरांच्या भगूरने हिंदुत्त्ववादी एकनाथ शिंदेंना नाकारलं, २५ वर्षांची सत्ता अजित पवारांनी उलथवली
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Bhagur NagarParishad election 2025 : भगूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी उलथापालथ झाल्याची पाहायला मिळाली. अजित पवार गटाने शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा मानला जात आहे.
नाशिक : भगूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी उलथापालथ झाल्याची पाहायला मिळाली. अजित पवार गटाने शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा मानला जात आहे.
नाशिकमधील भगूर नगरपरिषदेच्या जागेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. २०१७ च्या भगूर जागेसाठी झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालात, शिवसेनेच्या अनिता करंजकर विजयी झाल्या होत्या.
advertisement
महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले आणि २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले. निवडणूक आयोगाच्या मते, महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत एकूण १,०७,०३,५७६ नोंदणीकृत मतदार होते.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा आक्रमक प्रचार
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. मात्र यात अजित पवार हेच यशस्वी होताना दिसून आले. तब्बल २५ वर्ष सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेचा हा मोठा पराभव मानला जात आहे. अजित पवारांचे मोठे कमबॅक मानले जात आहे.
advertisement
भगूर नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच भाजप यांच्यात तिरंगी, चुरशीची लढत पाहायला मिळाली. सत्ताधारी विजय करंजकर यांना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरील उमेदवार असा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले होते.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 10:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhagur NagarParishad election 2025 : सावरकरांच्या भगूरने हिंदुत्त्ववादी एकनाथ शिंदेंना नाकारलं, २५ वर्षांची सत्ता अजित पवारांनी उलथवली









