Bhandara News : भंडाऱ्यात मारबतीच्या मिरवणुकीत तुफान राडा,दोन गटात तुंबळ हाणमारी, मारहाणीचा हादरवून टाकणारा VIDEO

Last Updated:

मारबत उत्सवादरम्यान दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. नेमका दोन गटात काय वाद झाला होता,याची माहिती समोर आली नाही.

Bhandara News : रवी सपाटे,भंडारा : नागपूरात नुकताच मारबत हा उत्सव संपन्न झाला आहे. या उत्सवादरम्यान भंडाऱ्यात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. मारबत उत्सवादरम्यान दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. नेमका दोन गटात काय वाद झाला होता,याची माहिती समोर आली नाही. पण या मारहाणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांढळ इथं शनिवारी पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी मारबत मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोन गटांमध्ये अचानक वाद झाला होता. सुरूवातीला शाब्दीक बाचाबाची झाली त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते.या मारहाणीनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, गावातील नागरिकांनी वाद मिटविला होता.
advertisement
या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस तक्रार झाली नाही. पण व्हिडिओ पाहता संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरते आहे.

मारबत म्हणजे काय?

मारबत हा उत्सव नागपूरच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. 145 वर्षांपासून साजरा होत असलेला या उत्सवाला ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व लाभलं आहे. काळी मारबत ही 144 वर्षांची परंपरा असलेली आहे. गेल्या 141 वर्षांपासून पिवळी मारबत नागपूरकरांच्या श्रद्धेचं प्रतीक ठरली आहे. या अनोख्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे, तो फक्त नागपूर शहरातच साजरा केला जातो, म्हणूनच देशभरातून याकडं विशेष लक्ष वेधलं जातं.
advertisement
मारबत म्हणजे समाजातील वाईट रूढी, अंधश्रद्धा, आणि अनिष्ट प्रथांचे प्रतीक, ज्यांचे दहन करून समाजात चांगल्या विचारांचे स्वागत करणे हा मुख्य उद्देश असतो. काळी मारबत ही कृष्णाच्या वधासाठी आलेल्या पुतना मावशीचे प्रतीक मानली जाते. तर पिवळी मारबत ही लोकांचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखली जाते. या दोन्ही मूर्ती मोठ्या आकारात बनवून पारंपरिक पद्धतीनं त्यांची पूजा आणि मिरवणूक केली जाते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhandara News : भंडाऱ्यात मारबतीच्या मिरवणुकीत तुफान राडा,दोन गटात तुंबळ हाणमारी, मारहाणीचा हादरवून टाकणारा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement