चूक कुणाची? आधी टेम्पोला धडक अन् डोकं सापडलं कंटेनरच्या चाकाखाली, मनविचलित करणारा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सोमवारी एका तरूणाचा कंटेनरखाली चिरडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. विनोद पाटील असे या (28) वर्षीय तरूणाचे नाव होते.
Bhiwandi Accident Video : नरेश पाटील, प्रतिनिधी, भिवंडी : भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सोमवारी एका तरूणाचा कंटेनरखाली चिरडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. विनोद पाटील असे या (28) वर्षीय तरूणाचे नाव होते. हा तरूण इंजिनियर व्यावसायिक होता.ही घटना वडपे भिवंडी रस्त्यावरील निंबवली फाट्यावर घडली होती. या घटनेने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.या अपघाताचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. हा सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगावर काटा येतोय.त्यामुळे या अपघातात नेमकी चूक कुणाची होती? हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पाटील हा तरूण पडघा वरून भिवंडीच्या दिशेने दुचाकीने प्रवास करत होता. यावेळी निंबवली नाक्यावर त्याच्या दुचाकीला अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमध्ये विनोद पाटील हा वडपे भिवंडी रस्त्यावरील निंबवली फाटा येथे येवई कडून येताना दिसतो आहे. या दरम्यान गांड्यांचा वेग फारच कमी आहे. या दरम्यान अचानक टेम्पो चालक ब्रेक मारतो ज्यामुळे बाईक जाऊन थेट टेम्पोला आदळते. या दरम्यान विनोद पाटील याचा बाईकवरून कंट्रोल सुटतो आणि तो थेट रस्त्यावर कोसळतो.या दरम्यान बाजूने जाणाऱ्या कंटेनरखाली सापडतो आणि त्याचा चिरडून मृत्यू होतो.
advertisement
दुचाकीवरून येणाऱ्या विनोदच्या गाडीचा धक्का टेम्पोला लागल्याने, विनोद खाली कोसळला आणि बाजूनेच जाणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन अपघात झाल्याचे CCTV मध्ये दिसत आहे.त्यामुळे या अपघातात सरळ सरळ चूक टेम्पो चालकाची दिसत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.या अपघातानंतर कंटनेर चालक फरार झाला आहे की पोलिसांनी त्याला पकडलं आहे?याची अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 14, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चूक कुणाची? आधी टेम्पोला धडक अन् डोकं सापडलं कंटेनरच्या चाकाखाली, मनविचलित करणारा VIDEO