Bhiwandi News : भिवंडीत 'फिर हेरा फेरी'सारखी घटना, पिस्तुल आणि नोटांची बंडलं, पोलीसही चक्रावले

Last Updated:

भिवंडीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत 'फिर हेरा फेरी' या बॉलिवूड सिनेमासारखा प्रकार घडला आहे. या सिनेमामध्ये काही कलाकार खेळण्यातल्या बनावट नोटा घेऊन बदलण्याचा प्रयत्न करतात.

500 duplicat note
500 duplicat note
Bhiwandi News : नरेश पाटील, भिवंडी : भिवंडीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत 'फिर हेरा फेरी' या बॉलिवूड सिनेमासारखा प्रकार घडला आहे. या सिनेमामध्ये काही कलाकार खेळण्यातल्या बनावट नोटा घेऊन बदलण्याचा प्रयत्न करतात. असेच या घटनेत दोन तरूणांनी खेळण्यातल्या नोटा घेऊन बदलण्याच्या प्रयत्नान होते. पण हे तरूण सर्वसामन्यांना लुटण्याआधीच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे.या दोन तरूणांकडून आता पोलिसांनी 6 लाख 33 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर हेरा फेरी सिनेमात बाबू भैय्या (परेश रावल) आणि अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे कलाकार नकली नोटा बदलण्यासाठी नेत असतात. अशाच नोटा बदलण्यासाठी काही तरूण नाशिकवरून भिवंडीतील मित्तल नगरमध्ये कारमधून अग्निशस्त्रासह येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून सापळा रचला होता. या सापळ्यात हे आरोपी अडकले आणि त्यांना मित्तलनगरच्या ममता हॉस्टिटलच्या बाजूला चाविंद्रा रोडवरून अटक केली होती.
advertisement
शिवानंद कोळी (वय24), राहुल शेजवळ (वय24) दोघेही सिहस्थ नगर,पार्थडी नाका, नाशिकचे राहणारे आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून कारमधून लहान मुलांच्या खेळण्यातील 500 रूपयाच्या 48 बंडल, एक माऊझर पिस्तुल आणि एक काडतूस आणि इको स्पोर्टस कार असा एकूण मिळून 6 लाख 33 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिवानंद कोळी आणि राहुल शेजवळ हे दोन्हीही आरोपी खेळण्यातल्या या नोटा खऱ्या भासवून बदलण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली होती. तसेच पोलिसांनी कोणीही अशा बनावट नोटा बदलीच्या आमिषाला बळी पडू नये, याबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात आणि गुन्हे शाखेत माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनामुळेच हा प्रकार उघडकीस आली आहे.
advertisement
या आरोपींवर भिवंडीच्या निजामपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 सह महाराष्ट्र अधिनियम चे कलम 37(1), 135 प्रमाणे गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi News : भिवंडीत 'फिर हेरा फेरी'सारखी घटना, पिस्तुल आणि नोटांची बंडलं, पोलीसही चक्रावले
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement