advertisement

आता टेंशनच नाय, शैक्षणिक सहलीसाठी कुठंही फिरा; राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिली 'या' बंपर ऑफर

Last Updated:

Maharashtra Student Education Trips: महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाविद्यालयीन आणि शालेय सहलींसाठी नवीन बसेस उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

Maharashtra Student Education Trips: आता टेंशनच नाय, शैक्षणिक सहलीसाठी कुठंही फिरा; राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिली 'या' बंपर ऑफर
Maharashtra Student Education Trips: आता टेंशनच नाय, शैक्षणिक सहलीसाठी कुठंही फिरा; राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिली 'या' बंपर ऑफर
महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाविद्यालयीन आणि शालेय सहलींसाठी नवीन बसेस उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या सहल काढतात. अनेकदा विद्यार्थ्यांना सहलीसाठी जुन्या एसटी बसमधून सहलीचा प्रवास करावा लागतो. पण आता यावर्षापासून जुन्या नाही, नव्या बसेसमधून विद्यार्थ्यांना प्रवास करायला मिळणार आहे.
अलीकडेच, विद्यार्थ्यांच्या खास सहलीसाठीच महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस डेपोमधून शाळांना सहलीसाठी 800 ते 1000 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
advertisement
दरम्यान, दरवर्षी शैक्षणिक सहलीसाठी परिवहन महामंडळाला तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी मिळतो. या सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यातील गड- किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळांना पाहायला नेतात. शैक्षणिक सहलीसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते. पण, परराज्यातील सहलीसाठी शासनाकडून सवलत मिळत नाही. ५० टक्क्यांची सवलत ही महाराष्ट्रापुरतीच आहे. सहलीसाठी एसटी बस बुकिंग करण्यासाठी सुरवातीलाच संपूर्ण रक्कम शाळेला भरावी लागते. दरम्यान, गतवर्षी शैक्षणिक सहलीसाठी अनेक शाळांची जुन्या बसगाड्यांमुळे खूपच पंचाईत झाली होती.
advertisement
जुन्या बसेसमुळे काही शाळांची दोन- चार दिवसांची सहल एक- दोन दिवसांनी लांबली होती. बसेस बंद पडल्यामुळे काही तास वाटेतच थांबून पर्यायी गाड्यांमधून विद्यार्थ्यांना पुढे मार्गस्थ व्हावे लागले. चालु शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी परिवहन मंत्र्यांनी प्रत्येक आगाराचे प्रमुख आणि विभागाचे प्रमुखांना आपआपल्या हद्दीतील शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. शिवाय, शालेय विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सहलीमध्ये राज्यातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटण्याचे नियोजन करण्यासाठी आगार प्रमुख, स्टेशन अधिकारी, शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना भेटतील, असे त्यात म्हटले आहे. त्यातून किती बसगाड्या सहलीसाठी लागतील, याचा अंदाज येईल.
advertisement
एसटी बसमधील प्रवास सुरक्षित असतो. अगदी खेड्यापासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी लालपरी म्हणजेच एसटी बस 24 तास प्रवाशांची सेवा बजावते. अनुभवी चालक, आरामदायी बैठक व्यवस्था आणि सुरक्षित प्रवासाची हमी ही लालपरीची वैशिष्ट्ये आहेत. पण, अचानक प्रवासादरम्यान कधी अपघात झाला तर शैक्षणिक सहलीत सहभागी विद्यार्थ्यांसाठी दहा लाखांचा विमा दिला जातो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आता टेंशनच नाय, शैक्षणिक सहलीसाठी कुठंही फिरा; राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिली 'या' बंपर ऑफर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement