Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ

Last Updated:

Dhule Eleciton: मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
धुळे: धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रातील खोली क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. या घटनेमागे भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला आहे.
सतीश महाले यांनी केलेल्या आरोपानुसार, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक १ मध्ये घुसून शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केली. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण होते.
advertisement
या प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर निवडणूक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement