BMC Election Reservation: बीएमसी आरक्षणात भाजप-शिंदे गटाला ‘लॉटरी’, ठाकरे गटाचं काय? नवं समीकरण आलं समोर...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Reservation : ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या माजी नगरसेवकांना फटका बसला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लढाईत भाजप एक पाऊल पुढे गेले आहे.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. मंगळवारी झालेल्या या आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीच्या आधी व़ॉर्ड कायम राहणे हे उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. मंगळवारी झालेल्या सोडतीमध्ये भाजप, शिंदे गटाला काहीसा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या माजी नगरसेवकांना फटका बसला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लढाईत भाजप एक पाऊल पुढे गेले आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आज मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, आणि महिला अशा विविध घटकांच्या प्रतिनिधीत्वासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
या आरक्षणाचा फटका सगळ्याच पक्षातील दिग्गजांना बसला. शिवसेना ठाकरे गटासह भाजप, शिंदे गटाच्या नगरसेवकांनाही दुसऱ्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागू शकते. अन्यथा या टर्ममध्ये विश्रांती घ्यावी लागू शकते, अशी चिन्हे आहेत.
advertisement
भाजपला फायदा...
महापालिकेच्या आरक्षण सोडतीत अनेक माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला. मात्र, काही माजी नगरसवकांच्या वॉर्डमध्ये कोणताही बदल झाला नाही. जवळपास 59 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये बदल झाला नाही. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांची सर्वाधिक संख्या अधिक आहे. भाजपच्या २६ माजी नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये कोणताही बदल झाला नाही. या २६ माजी नगरसेवकांमध्ये, प्रभाकर शिंदे बिना दोशी, बाळा तावडे, विनोद मिश्रा, रोहन राठोड, हेतल गाला आदींचा समावेश आहे.
advertisement
शिंदेंकडील १४ माजी नगरसेवकांना फायदा, ठाकरेंचं काय?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि इतर पक्षातील माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचले. यामध्ये जवळपास १४ माजी नगरसेवकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यात राजूल पटेल, समृद्धी काते, संजय तुर्डे, समाधान सरवणकर यांचा समावेश आहे.
तर, काँग्रेसच्या आशा कोपरकर, मेहेर हैदर, अश्रफ आझमी यांच्याही जागा कायम आहेत. ठाकरे गटाच्या जवळपास ११ माजी नगरसेवकांचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल कोकीळ यांचा समावेश आहे. तर, माजी महापौर मिलिंद वैद्य, तेजस्वी घोसाळकर, आशिष चेंबूरकर यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Reservation: बीएमसी आरक्षणात भाजप-शिंदे गटाला ‘लॉटरी’, ठाकरे गटाचं काय? नवं समीकरण आलं समोर...


