शिर्डीत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपची मोठी घोषणा, रविंद्र चव्हाण यांच्याकडे महत्त्वाचे पद

Last Updated:

Ravindra Chavan: अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे रविंद्र चव्हाण यांची तुर्तास कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

रविंद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस
रविंद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस
शिर्डी, अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे रविंद्र चव्हाण यांची तुर्तास कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजप अध्यक्षपदाची नेमणूक अजून काही दिवस लांबणीवर पडलेली आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळे पदावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविंद्र चव्हाण हेच पुढील भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील, असे सांगितले जात होते. शिर्डीतील अधिवेशनात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असेही बोलले जात होते. मात्र तूर्तास त्यांच्याकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मार्चमध्ये भाजपाध्यक्षपदाची निवड होणार असल्याचे सांगण्यात येते.

रविंद्र चव्हाण यांच्यासाठी पक्ष संघटनेत नवे पद

भाजप पक्षसंघटनेत यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपद असे पद अस्तित्वात नव्हते. रविंद्र चव्हाण यांना याआधी संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी केले होते. यानंतर आता कार्यकारी अध्यक्षपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार असल्याची माहिती आहे.
advertisement

कोण आहेत रविंद्र चव्हाण?

रविंद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळख
रविंद्र चव्हाण हे मूळ कोकणातील आहेत, परंतु डोंबिवली मतदारसंघातून ते निवडून येतात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखले जाते
रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिमंडळातही काम केले आहे, प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिर्डीत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपची मोठी घोषणा, रविंद्र चव्हाण यांच्याकडे महत्त्वाचे पद
Next Article
advertisement
Nanded Crime : 'तीन गोळ्या झाडल्या तरी जिवंत होता, नंतर भावांनी...', सक्षमसोबत काय झालं, आंचलने सगळं सांगितलं...
'तीन गोळ्या झाडल्या तरी जिवंत होता, नंतर भावांनी...', सक्षमसोबत काय झालं, आंचलने
  • 'तीन गोळ्या झाडल्या तरी जिवंत होता, नंतर भावांनी...', सक्षमसोबत काय झालं, आंचलने

  • 'तीन गोळ्या झाडल्या तरी जिवंत होता, नंतर भावांनी...', सक्षमसोबत काय झालं, आंचलने

  • 'तीन गोळ्या झाडल्या तरी जिवंत होता, नंतर भावांनी...', सक्षमसोबत काय झालं, आंचलने

View All
advertisement