advertisement

BMC Election: मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश पाहा यादी

Last Updated:

BJP BMC Candidates: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी भाजपने चंगच बांधला आहे. मात्र, २०१७ मध्ये निवडून आलेल्या ३२ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी नाकारली आहे.

मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश, पाहा यादी
मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश, पाहा यादी
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी भाजपने चंगच बांधला आहे. भाजप मुंबई महापालिकेत १३७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजपने यंदा आपल्या उमेदवारांच्या यादीत तरुण आणि नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. मात्र, २०१७ मध्ये निवडून आलेल्या ३२ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी नाकारली आहे.
advertisement
भाजपने महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून नवीन डावपेच टाकत विरोधकांना खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. मागील २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ८२ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, त्यातील ३२ जणांच्या नावावर काट मारली आहे. या नगरसेवकांच्या जागी नवीन उमेदवार देण्यामागे काही कारणं असल्याचे समोर आले आहे.

कोणत्या कारणाने उमेदवारी नाकारली?

advertisement
या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी नाकारण्यामागे काही कारणे आहेत. यात, वॉर्ड आरक्षण महत्त्वाचे आहे. तर, काहींना वयाच्या मुद्यावर पुन्हा संधी नाकारण्यात आली. तर, दोन दिवगंत नगरसेवकांच्या जागी दोन नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर निधन झालेल्या एका नगरसेवकाच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संधी देण्यात आली आहे.

>> भाजपने कोणाला नाकारली संधी? पाहा यादी

advertisement
वॉर्ड क्र.माजी नगरसेवकविद्यमान उमेदवार
2जगदीश ओझातेजस्वी घोसाळकर
8हरीश रावजीयोगिता पाटील
13विद्यार्थी सिंगराणी द्विवेदी
14आशावरी पाटीलॲड. सीमा शिंदे
15प्रवीण शाहजिग्ना शाह
16अंजली खेडकरश्वेता कोरगावकर
17बिना दोषीडॉ. शिल्पा सांगोरे
21प्रतिभा गिरकरलीना देहेरकर
22प्रियांका मोरेहिमांशू पारेख
24सुनीता यादवस्वाती जयस्वाल
27सुरेखा पाटीलनीलम गुरव
29सागर ठाकूरनितीन चव्हाण
30सेजल देसाईयोगेश वर्मा
36दक्षा पटेलसिद्धार्थ शर्मा
45डॉ. राम बारोटसंजय कांबळे
50दीपक सिंगविक्रम राजपूत
67रेणू भसीनसुधा सिंग
85ज्योती अळवणीमिलिंद शिंदे
99संजय अगळदरेजितेंद्र राऊत
103मनोज कोटकहेतल मोर्वेकर
105रजनी केणीअनिता वैती
107स्मित कांबळेनील सोमय्या
122वैशाली पाटीलचंदन शर्मा
132पराग शाहऋतू तावडे
139बिंदू त्रिवेदीधर्मेश गिरी
174कृष्णवेणी रेड्डीसाक्षी कनोजिया
177नेहल शाहकल्पेश कोठारी
217मीनल पटेलॲड. गौरांग झवेरी
218अनुराधा पोतदारस्नेहल तेंडुलकर
219ज्योत्स्ना मेहतासाक्षी सानप
220अतुल शाहदिपाली कुलथे
advertisement

मतदानाआधीच दोन जागांवर फटका..

भाजपला मतदानापूर्वीच दोन जागांवर फटका बसला आहे. वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ मध्ये महायुतीचा उमेदवार नाही. वॉर्ड क्रमांक २११ मध्ये भाजप उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. तर, २१२ मध्ये भाजपच्या महिला उमेदवाराला अर्ज दाखल करण्यास १५ मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे एबी फॉर्म असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या वॉर्डमध्ये अपक्ष अथवा अन्य उमेदवाराला भाजपला पाठिंबा द्यावा लागणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश पाहा यादी
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement