advertisement

मुलाच्या बर्थ डे पार्टीसाठी साहित्य घेऊन येत होते, वाटेतच भाजपच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या, नागपूर हादरलं

Last Updated:

मृतक सचिन शाहू यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले होते.

News18
News18
 वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
नागपूर: राज्यात स्थानिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ठीकठिकाणी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अशातच  उत्तर नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भर दिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर नागपूर भागात यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात ही घटना घडली आहे. सचिन साहू असं हत्या झालेल्या इसमाचं आहे.  सचिन साहू हे  उत्तर नागपुरातील वार्डचे अध्यक्ष होते. मृतक सचिन शाहू यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी येत असताना वाटेतच कांजी हाऊस परिसरात अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. भर दिवसा ही घटना घडली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून सचिन साहू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.   जुन्या पैशाच्या देवाण-घेवाणीचा वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मारेकरी नेमके कोण होते? हत्येमागाचे नमेकं कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही तपासात आरोपीचा मागोवा घेत आहे, तीन ते चार जण असल्याचा पोलिसाचा संशय आहे.
advertisement
दरम्यान, मृतक सचिन शाहू यांचा गणपती उत्सवाच्या दरम्यान काही लोकांशी वाद झाला होता. त्यामुळे त्यांच्या हत्येमागे त्या लोकांचा समावेश असल्याचा मृतकाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. या प्रकरणी यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलाच्या बर्थ डे पार्टीसाठी साहित्य घेऊन येत होते, वाटेतच भाजपच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या, नागपूर हादरलं
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement