भाजपमधील त्यांच्या जखमेवर मिठ अन् देवाभाऊंंना गाठलं खिंडीत, पहिल्याच सभेत ठाकरे बंधूंचा 'सिक्सर'
- Published by:Sachin S
Last Updated:
आतापर्यंत आरोप प्रत्यारोपच्या इनिंगनंतर आता थेट मैदानात युद्धाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा विराट अशा गर्दीत नाशिकमध्ये पार पडली.
नाशिक : राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. पण, खरं पाहता ही महापालिका निवडणूक ठाकरे विरुद्ध भाजप अशीच आहे. आतापर्यंत आरोप प्रत्यारोपच्या इनिंगनंतर आता थेट मैदानात युद्धाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा विराट अशा गर्दीत नाशिकमध्ये पार पडली. यावेळी दोन्ही भावांनी भाजपमध्ये नाराज असलेल्या निष्ठावंत, पक्षात आयाराम, महायुतीतील तंटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासानांचा समाचार घेत जोरदार प्रहार केला.
राज ठाकरेंच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस!
फडणवीस काय बोलून गेले होते, नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिक रिंगरोड, नाशिक सेमी हायस्पिड मार्ग, इगतपुरी क्रीडा प्रबोधनी अशा अनेक घोषणा केल्या होत्या, पण काहीही केलं नाही, म्हणे दत्तक घेणार. यांना काम करायचं नाही. जाती आणि धर्माच्या नावावर भूलवायचं हेच काम केलं.
advertisement
तपोवनमध्ये महाजनांना झाडं छाटायचं होतं, लाकूड तोड्या बरा होता, आधी सोन्याची दिली, नंतर चांदीची दिली. तिच्या खरी दिली तेव्हा घेतली. झाडं छाटायच्या आधी स्वत: च्या पक्षातील लोक छाटली. बाहेरून उमेदवार घेतली आणि भाजपमध्ये झाडं लावली. ही कोणती निवडणूक चालू आहे. २०१२ साली इथं मनसेची सत्ता आली होती, २०१७ साली इथं फडणवीस आले आणि दत्तक घेतो म्हणाले. त्या सगळ्याला नाशिककर भूलले, आमचं काम विसरून गेले. दत्तक घेतो म्हणून बोलले आणि हा बाप परत फिरला नाही. काय काय सांगितलं होतं.
advertisement
नाशिकमध्ये ५२ साली आलेला जनसंघ पक्ष आता २०२६ मध्ये पोरं भाड्याने घेताय, तुम्ही तुमची पोरं उभी केली ना, मग दुसऱ्याची पोरं का कड्यावर घेऊन फिरता. एकावेळी दोन चार उमेदवार देतात येतात हे समजू शकतो.पण पक्षासाठी इतकी वर्ष काम करतात, त्यांना उमेदवारी देत नाही, भाजपच्या निष्ठावंताचा अपमान नाही का?
"कोण कुणाकडे चाललाय, हेच कळत नाही, कॅरेम इतका फुटला आहे. कुणाच्या कवड्या कोणत्या भोकात जात आहे, कळत नाही. वेडेपीसे झाले आहे. ६० ते ७० उमेदवार हे बिनविरोध निवडून येतात. तिकडे मतदानांचा अधिकार ही काढून घेतात, काही वेळा तर दहशतीतून जास्ती जास्त वेळा पैसे दिले जात आहे. कुणाला एक १ कोटी, कुणाला ५ कोटी पैसे दिले जात आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एका घरातील तिघे एका प्रभात उभे आहे, काय ऑफर दिली, एका घरात १५ कोटींची ऑफर तिघांना दिली. कुणाला २ कोटी, कुणाला ५ कोटी पैसे दिले. इतके पैसे येतात कुठून? असा आरोपच राज ठाकरेंनी केला.
advertisement
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेतलं म्हणाले, पण हे काय विकास करणार आहे. ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागत आहे, ते काय शहराचा विकास करणार आहे. त्यामुळे मोहन भागवत यांना टाहो फोडावा लागत आहे, पोरं जन्माला घाला. भाजप आज उपटसुंभाचा पक्ष झाला आहे. पण निष्ठावंत माणसं इथं सुद्धा आहे. मी भाजपवाल्यांना विचारत आहे. काय नशिबी आलं आहे तुमचं, काय उपटसुभ्यांचा सतरंज्या उचलायचं काम करत आहे. सलीम कुत्ता साथीदारासोबत फोटो होता, तो पक्ष वाढवायला सगळं चालतं, अशी बरबटलेली माणसं तुम्हाला चालतात, त्यांची शी सू साफ करून डोक्यावर घेऊन नाचायचं. हे निष्ठावंत भाजपच्या नशिबी आलं आहे, असा भाजप तुम्हाला पाहिजे होता का? असा सवालच उद्धव ठाकरेंनी केला.
advertisement
"मला भाजपच्या निष्ठावंत देवयानी फरांदे ताईंना रडू आवरलं नाही, हे आवडलं नाही. आज मी जे बोलतोय त्यावर नक्की टीका करा, ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगताय, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. हे माझं वाक्य नाही देवयानी ताईंचं वाक्य आहे, दलालांनी चुकीचं ब्रिफींग केलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणताय, भाजपला दरवाजेच नाहीये, मुनगंटीवार तुम्हाला कल्पना आहे, शनीशिंगानापूरला संकटग्रस्त जातात, पण भाजपमध्ये येतात ईडी, सीबीआयग्रस्त येताय. चोर दरोडखोर सुद्धा येत आहे. उद्या रावण जर पक्षात आला तरी त्याला पक्षात घ्यायला बसले. एवढे निर्ल्लज्ज झाले आहे कुठे आहे, यांचं हिंदूत्व?
advertisement
भाजपने एमआयएम सोबत युती ते काय होतं?
"भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो होतो. आता अकोटमध्ये भाजपने एमआयएम सोबत युती केली, अंबरनाथमध्ये जिथे शिव मंदिर आहे. मिंध्याचा पक्ष होता, तिथे काँग्रेससोबत युती केली. बरं समविचारी म्हणजे काय तर सगळे भ्रष्टाचारी आणि चोर दरोडखोर एकत्र येत आहे. भ्रष्टाचार मेळावा भाजप पक्ष वाढवावा"
advertisement
नाईक तुम्ही टांगा पलटी कराच?
view commentsगणेश नाईक हे पहिले आपले, आणि मिंधे हा पण पुर्वीचा आपला. आता गणेश नाईक काय म्हणाले, मिंधेनं एफएसआयमध्ये घोटाळा केला, जर भाजपने परवानगी दिली तर यांचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना विचारायचंय, मग टांग्यात कशाला बसायचं. टांगा पाडा की उलटा, टांग्यात टांग्या कशाला घालता. हीच लोक सांगताय, कशी अभद्र युतीत आहे. तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलतंय.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 10:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपमधील त्यांच्या जखमेवर मिठ अन् देवाभाऊंंना गाठलं खिंडीत, पहिल्याच सभेत ठाकरे बंधूंचा 'सिक्सर'








