ठाकरेंचा महापौर होणार, भाजपही करणार सपोर्ट? युतीच्या आमदाराकडून ऑफर, कुठे फिरणार आख्खं राजकारण

Last Updated:

संपूर्ण राज्याचं मुंबईकडे लक्ष असताना मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या एका महापालिकेत आख्खं राजकारण फिरवणारी घडामोड घडत आहे.

News18
News18
16 जानेवारीला राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. बहुतांशी महापालिकांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे २९ पैकी जवळपास २३ ठिकाणी महायुतीचा महापौर होणार हे जवळपास फिक्स झालं आहे. पण अद्याप अनेक ठिकाणी महापौर पदासाठीची सोडत निघाली नसल्याने महापौर कुणाचा होणार? कोण होणार? याबाबत सस्पेन्स कायम आहे.
आशिया खंडातील सगळ्यात मोठी महापालिका असेलल्या मुंबईत देखील महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी इथं अद्याप महापौर पदाचा उमेदवार ठरला नाही. इथं शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. इथं शिंदेंना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ठाकरे गटाकडून भाजपला पडद्याआडून मदत केली जात असल्याची देखील चर्चा आहे. एकूणच संपूर्ण राज्याचं मुंबईकडे लक्ष असताना मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या एका महापालिकेत आख्खं राजकारण फिरवणारी घडामोड घडत आहे.
advertisement
चंद्रपूर महापालिकेत भाजपकडून थेट ठाकरे गटाला महापौर पदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे इथं ठाकरे गटाचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले आहेत. तरीही २३ नगरसेवक असलेल्या भाजपनं ठाकरे गटाला महापौर पदाची ऑफर दिली आहे. भाजपच्या एका आमदारानेच ही ऑफर दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. या महापालिकेत ठाकरे गट हा किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
advertisement
६६ सदस्य असलेल्या या महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'किंगमेकर'च्या भूमिकेत असलेल्या शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत आपला आठ सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. "जो आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आमचे समर्थन मिळेल," अशी आक्रमक आणि ठाम भूमिका शिवसेना (उबाठा) गटाने घेतल्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. इथं काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत.
advertisement
चंद्रपूर मनपात एकूण ६६ जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३४ या बहुमताच्या आकड्याची (Magic Figure) गरज आहे. सद्यस्थितीत कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही:
काँग्रेस आघाडी: काँग्रेस (२७) + शेकाप (३) = ३० सदस्य (बहुमतासाठी ४ जागा कमी)
भाजप युती: भाजप (२३) + शिवसेना शिंदे गट (१) = २४ सदस्य (बहुमतासाठी १० जागा कमी)
advertisement
तिसरा गट: शिवसेना उबाठा (६) + वंचित बहुजन आघाडी (२) = ०८ सदस्य
इतर: अपक्ष (२), बसप (१) आणि एमआयएम (१).
काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी केवळ ४ सदस्यांची गरज आहे, तर भाजपला १० सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. अशा स्थितीत शिवसेना (उबाठा) आणि वंचितचा ८ सदस्यांचा गट ज्या बाजूला जाईल, त्याचे पारडे जड होणार आहे. शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिहे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "आजवर आम्ही पदाची अपेक्षा न ठेवता आघाडीला साथ दिली. पण आता चंद्रपूर मनपात शिवसेनेचाच महापौर असावा ही आमची इच्छा आहे. जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आमचे समर्थन राहील."
advertisement
ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे आता चंद्रपूरात भाजपच्या एका आमदाराने ठाकरे गटाला महापौर पदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार किशोर जोरगेवार देखील ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता ठाकरे गट भाजपच्या पाठिंब्याने आपला महापौर करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाने चंद्रपुरात काँग्रेसला धक्का दिला, तर याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळू शकतात. त्यामुळे चंद्रपूरच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरेंचा महापौर होणार, भाजपही करणार सपोर्ट? युतीच्या आमदाराकडून ऑफर, कुठे फिरणार आख्खं राजकारण
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement