advertisement

Maharashtra Loca महायुतीत जागा वाटपांवरून रस्सीखेच! भाजपचा प्लॅन बी तयार, शिंदेसह दादांनाही धक्का?

Last Updated:

Maharashtra Local Body Election : महायुतीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीमध्ये जागा वाटपांच्या मुद्यांवरून खटके उडवण्यास सुरुवात झाली आहे.

महायुतीत जागा वाटपांवरून रस्सीखेच! भाजपचा प्लॅन बी तयार, शिंदेसह दादांनाही धक्का?
महायुतीत जागा वाटपांवरून रस्सीखेच! भाजपचा प्लॅन बी तयार, शिंदेसह दादांनाही धक्का?
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे आता आघाडी, युतीच्या चर्चांना वेग आला आहे. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महायुतीबाबत निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. महायुती न झाल्यास भाजपने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. भाजपकडून स्थानिक निवडणुकीत विरोधकांनासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.
महायुतीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीमध्ये जागा वाटपांच्या मुद्यांवरून खटके उडवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता महायुतीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्रपणे स्पर्धेला सज्ज होण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. महायुती झाली नाही, तर प्रत्येक नगरपालिका आणि नगरपंचायतीत आपला उमेदवार उभा करण्यासाठी भाजपने ‘प्लॅन बी’ अंतिम टप्प्यात आणला आहे.
advertisement
निवडणूक घोषणेआधीच भाजपने तयारीला वेग दिला. शनिवार, रविवार व सोमवारी प्रत्येक नगरपालिकेच्या शहरांत पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांना पाठविण्यात आले होते. या निरीक्षकांनी स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि शहरातील कार्यकारिणीकडून ‘वन-टू-वन’ चर्चा केली. यामधूनच थेट नगराध्यक्षपदासाठी तीन संभाव्य नावांची निवड केली. ही तिन्ही नावे लिफाफ्यात बंद करून थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
advertisement

युती की स्वबळाचा निर्णय?

या चर्चांत फक्त नगराध्यक्षांचे नावच नव्हे, तर आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीतीवर विचारमंथन झाले असल्याचे वृत्त आहे. निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडून नगरसेवकपदी कोणाला संधी द्यायची? युती केल्यास शिंदे गट आणि अजित पवार गटाला जागा कशा वाटायच्या? युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी किती आहे? या मुद्यांवरही मत जाणून घेतले आहे.
advertisement

नावांचेही होणार सर्वेक्षण...

प्रत्येक नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रस्तावित असलेल्या तीन नावांचे सर्वेक्षण होणार आहे. दोन ते तीन दिवसांत हा सर्वेक्षण अहवाल पक्ष नेतृत्वापुढे जाईल. तीन नावांव्यतिरिक्त एखादी प्रभावी, परंतु पक्षात सक्रिय नसलेली व्यक्तीही योग्य उमेदवार ठरू शकते का, याचाही शोध घेतला जात आहे. समाजात प्रसिद्ध असणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Loca महायुतीत जागा वाटपांवरून रस्सीखेच! भाजपचा प्लॅन बी तयार, शिंदेसह दादांनाही धक्का?
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement