Nagar Parishad Election: प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपला धक्का, 2 उमेदवारांनी 'मैदान' सोडलं!

Last Updated:

हिंगोलीमध्ये नगर पंचायत आणि नगरपरिषदा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पण..

BJP
BJP
मनीष खरात, प्रतिनिधी
हिंगोली : राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. राज्यभरात प्रचार सभा एकीकडे सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपला ऐन प्रचारादरम्यान धक्का बसला आहे.  हिंगोलीत भाजपच्या नगरसेवकपदाच्या आणखी दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
हिंगोलीमध्ये नगर पंचायत आणि नगरपरिषदा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पण, अचानक भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकपदाच्या आणखी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. काही उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा सुनावणीच्या अनुषंगाने उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली होती.
advertisement
त्यातीलच भाजपच्या समिता सचिन जयस्वाल यांनी प्रभाग क्रमांक 11 ब मधून तर रंजना बाबुराव जाधव यांनी प्रभाग क्रमांक 15 ब मधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आतापर्यंत हिंगोली नगरपरिषद निवडणुकीतून भाजपच्या नगरसेवकदाच्या पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे.
शिवसेनेचा सुद्धा भाजपला धक्का
दरम्यान, हिंगोलीमध्ये महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं पाहण्यास मिळालं.  राज्यात भाजप शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी फोडाफोडीचं प्रकरण गाजलं होतं. त्याच दरम्यान, हिंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपला धक्का दिला. हिंगोली नगरपरिषद वार्ड क्रमांक 16 ब मधील भाजपचे अधिकृत उमेदवार भास्कर बांगर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवसेनेचं उमेदवार श्याम कदम यांना पाठिंबा दिला आहे, एवढंच नव्हे तर त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे हिंगोली भाजपला हा चांगलाच धक्का मानला जात आहे.
advertisement
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश
तर,  हिंगोलीत भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने भाजपला सोडचिठ्ठी देत आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण, ऐनवेळी मात्र दुसऱ्याला उमेदवारी दिल्याचा आरोप ज्योती वाघमारे यांनी केला होता. नाराज झालेल्या या महिला पदाधिकाऱ्याने भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election: प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपला धक्का, 2 उमेदवारांनी 'मैदान' सोडलं!
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement