BMC कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस, अधिकारी-शिक्षक-कर्मचाऱ्यांची 'दिवाळी गोड'
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BMC Announced Diwali Bonus: दीपावली – २०२५ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान जाहीर
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना दीपावली २०२५ प्रीत्यर्थ ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. दीपावली – २०२५ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे.
कुणाला किती बोनस?
१. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/-
२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये ३१,०००/-
३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये ३१,०००/-
४. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
advertisement
६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये ३१,०००/-
८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १४,०००/-
९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये ०५,०००/
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 3:35 PM IST