BMC Election Results : धाकधूक वाढवली, टेन्शन देणारी मतमोजणी! अवघ्या ७ मतांनी निकाल लागलेला वॉर्ड कोणता?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Results: मुंबईतील एका मतदारसंघातील मतमोजणीत मोठाच ट्विस्ट येत होता. दोन उमेदवारांमध्ये जोरदार रंगत आली होती. अखेर ७ मतांनी निकाल जाहीर झाला.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून मतमोजणीच्या दरम्यान अनेक ट्विस्ट आले. आघाडीवर असलेल्या काही उमेदवारांना अचानकपणे शेवटच्या फेरीत समीकरणे बदलल्याचं दिसून आलं. मुंबईतील एका मतदारसंघातील मतमोजणीत मोठाच ट्विस्ट येत होता. दोन उमेदवारांमधील लढतीत जोरदार रंगत आली होती. अखेर ७ मतांनी निकाल जाहीर झाला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग ९० (कलिना) मध्ये शुक्रवारी दुपारी प्रचंड नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेसच्या उमेदवार ॲड. ट्युलिप मिरांडा यांनी भाजप उमेदवाराचा अवघ्या ७ मतांच्या फरकाने पराभव करत निसटता विजय मिळवला. या विजयानंतर भाजपने आक्षेप घेत तातडीने फेरमतमोजणीची मागणी केली होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
> निकालाचा थरार
सुरुवातीच्या मतमोजणीनुसार, काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांना ५,१९७ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार ज्योती उपाध्याय यांना ५,१९० मते मिळाली. मतांमधील अंतर अत्यंत कमी असल्याने (फक्त ७ मते) उपाध्याय यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिला आणि फेरमतमोजणीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य करत पुन्हा मतमोजणी केली, मात्र दुसऱ्यांदाही मिरांडा यांच्या विजयावरच शिक्कामोर्तब झाले.
advertisement
विजयानंतर भावूक झालेल्या ट्युलिप मिरांडा म्हणाल्या, "हा विजय माझ्या कष्टाचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. विरोधकांनी पैसे वाटताना आम्ही रंगेहाथ पकडले होते, तरीही लोकांनी मला साथ दिली. या मोहिमेत त्यांचे पती आणि माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पदपथांवरील अतिक्रमणे, बेकायदा फेरीवाले आणि पार्किंगच्या समस्यांवर भर दिला होता.
advertisement
या वॉर्डमधील निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराने लक्षणीय मते घेतली. तर, काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले, अपक्ष उमेदवार जॉन अब्राहम यांनी जवळपास १२०० हून अधिक मते घेतली. यामुळे या वॉर्डातील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 12:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Results : धाकधूक वाढवली, टेन्शन देणारी मतमोजणी! अवघ्या ७ मतांनी निकाल लागलेला वॉर्ड कोणता?










