BMC Election : बीएमसीची रणधुमाळी! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुती देणार ठस्सन, दादर-माहीममध्ये चुरस!

Last Updated:

BMC Election Mahayuti vs Thackerays : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आपल्या विजयाचा झेंडा रोवण्यासाठी शिंदे गट आणि भाजप उत्सुक आहेत. तर, ठाकरे बंधूंकडून आपल्या बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत.

बीएमसीची रणधुमाळी! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुती देणार ठस्सन, दादर-माहीममध्ये चुरस!
बीएमसीची रणधुमाळी! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुती देणार ठस्सन, दादर-माहीममध्ये चुरस!
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: मराठी बहुल भाग असलेला आणि ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीममध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आपल्या विजयाचा झेंडा रोवण्यासाठी शिंदे गट आणि भाजप उत्सुक आहेत. तर, ठाकरे बंधूंकडून आपल्या बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत. शिवसेनेची स्थापना ज्या दादरमध्ये झाली, त्या भागातील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणुकीत उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे माहिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची चुरस अभूतपूर्व होणार आहे.  याच भागात शिवसेना भवन असल्याने या निवडणुकीला वेगळंच भावनिक महत्त्व आहे.
माहिम विधानसभा क्षेत्र हे सेना-मनसे युतीचं प्रमुख रणांगण ठरणार आहे. या मतदारसंघात एकूण पाच प्रभाग आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक १८२ (ओबीसी), १९० (खुला प्रवर्ग), १९१ (ओबीसी महिला), १९२ (खुला प्रवर्ग) आणि १९४ (खुला) असे आरक्षण आहे. यापैकी २०१७ च्या निवडणुकीत फक्त एका प्रभागात भाजपचा नगरसेवक विजयी झाला. तर उर्वरित चार प्रभागांमध्ये एकसंध शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते.
advertisement

लोकसभेत महायुतीला मताधिक्य, विधानसभेत निसटता पराभव...

मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र असतानाही माहिम विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मताधिक्य मिळवले होते. तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, ठाकरे सेना आणि मनसे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने मतविभाजन झालं आणि त्याचा फटका सदा सरवणकर यांना बसला. फार कमी मतांच्या अंतराने पराभूत झाले होते. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता.
advertisement

महायुतीकडून मोर्चेबांधणी...

या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर भाजपच्या पाठबळावर सर्व प्रभाग आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे. सदा सरवणकर यांना स्थानिक पातळीवरील समीकरणांचा चांगला अंदाज आहे. त्याचा फायदा महायुतीला होईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. तर, दुसरीकडे, मनसेने ठाकरे गटासोबत हातमिळवणी केल्यामुळे या युतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे ठाकरे गट-मनसे युती पाचही प्रभागांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
advertisement
दादर-माहिम परिसरातील ही लढत केवळ प्रभागापुरती मर्यादित न राहता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे राज्यातील राजकारणात नवा संदेश देणारी ठरणार आहे.

>> प्रभाग आणि संंभाव्य उमेदवार कोण?

प्रभाग क्रमांक : १८२ (ओबीसी)
ठाकरे सेना : मिलिंद वैद्य, अभय तामोरे
शिवसेना: मिलिंद तांडेल, श्रद्धा पाटील
प्रभाग क्रमांक : १९० खुला
भाजप : शीतल गंभीर-देसाई,
advertisement
मनसे : मनीष चव्हाण
शिवसेना : राजू पाटणकर
ठाकरे सेना : रोहिता ठाकूर, उमेश महाले
प्रभाग क्रमांक : १९१ (ओबीसी महिला)
ठाकरेसेना : दीपाली साने, वैशाली पाटणकर
शिवसेना : प्रिया सरवणकर
प्रभाग क्रमांक १९२ (खुला प्रवर्ग)
ठाकरे गट : संदीप अप्पा पाटील
भाजपा : जितेंद्र राऊत, अक्षता तेंडुलकर, सचिन शिंदे
मनसे : यशवंत किल्लेदार
advertisement
प्रभाग क्रमांक १९४ (खुला प्रवर्ग)
ठाकरे सेना :  संजय भगत
मनसे : यशवंत किल्लेदार, संतोष धुरी
शिवसेना : समाधान सरवणकर
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : बीएमसीची रणधुमाळी! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुती देणार ठस्सन, दादर-माहीममध्ये चुरस!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement