BMC Election : लागा तयारीला! महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधी? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

BMC Elections : मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या निवडणुकांबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

लागा तयारीला! महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधी? समोर आली मोठी अपडेट
लागा तयारीला! महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधी? समोर आली मोठी अपडेट
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका संपताच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या निवडणुकांबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
राज्याच्या स्थानिक राजकारणात या निवडणुकांमुळे नव्या आघाड्या आणि युतीचे प्रयोग सुरू झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकत्र लढतीचा विषय समोर आल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
advertisement

विकास कामांचा धडाका...

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा सपाटा सुरू आहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांकडून पालिका प्रशासनाला उद्घाटने तातडीने पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेतही गडबडगोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिका निवडणुकांचा धुरळा कधी?

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका केवळ स्थानिक स्वरूपाच्या न राहता ‘मिनी विधानसभा निवडणुका’ ठरणार आहेत.
advertisement

आचारसंहिता कधी?

महापालिका निवडणुका या जानेवारी महिन्यातच पार पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ आधी पूर्ण करणे आवश्यक आहेत. जानेवारीत महापालिकांच्या निवडणुका होणार असल्यने आता पुढील महिन्यात, डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता ही १५ डिसेंबरनंतर लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
आगामी महिनाभरातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुका ही राज्यातील सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : लागा तयारीला! महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधी? समोर आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement