कराडमध्ये भीषण अपघात, तरुणीच्या अंगावरून गेली भरधाव बोलेरो, धडकी भरवणारा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Accident in Karad: कराड शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका तरुणीच्या अंगावरून भरधाव बोलेरो गाडी गेली आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी कराड: कराड शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक या मार्गावर दुचाकी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर भरधाव वेगात असणारी बोलेरो गाडी थेट तरुणीच्या अंगावरून गेली आहे. तरुणी चारही चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताचा धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवती दुचाकीवरून सुसाट वेगात जात होत्या. दरम्यान, एका चौकात डाव्या बाजुने येणारी बोलेरो गाडी न पाहाताच तरुणींनी वेगाने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पण बोलेरो गाडीचा देखील वेग अधिक असल्याने बोलेरोनं दुचाकीला धडक मारली. यावेळी दुचाकीवरील दोन्ही युवती रस्त्यावर खाली पडल्या. दरम्यान, दुचाकी चालवणारी युवती थेट बोलेरोच्या चाकाखाली आली. बोलेरो थेट खाली पडलेल्या युवतींच्या अंगावरून पुढे गेली.
advertisement
अपघात घडताच परिसरात मोठा आवाज झाला आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी युवतींना वाचवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही युवती या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या कृष्णा हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कराडमध्ये दुचाकी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात, तरुणीच्या अंगावरून गेली गाडी pic.twitter.com/JAqDCaa1Ps
— News18 Marathi (@News18_marathi) January 20, 2026
advertisement
सीसीटीव्हीत कैद झाला थरार
हा संपूर्ण अपघात परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्या वेगाने ही बोलेरो गाडी युवतींच्या अंगावरून गेली, ते पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Karad,Satara,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 2:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कराडमध्ये भीषण अपघात, तरुणीच्या अंगावरून गेली भरधाव बोलेरो, धडकी भरवणारा VIDEO









