फेब्रुवारीत लग्न, साखरपुड्याच्या आदल्या दिवशी कळालं नवरी गरोदर, अलिबागमध्ये 15 वर्षीय मुलीसोबत नको तेच घडलं

Last Updated:

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एक अल्पवयीन मुलगी साखरपुड्याच्या आदल्या दिवशी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचं आढळली आहे.

News18
News18
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एक अल्पवयीन मुलगी साखरपुड्याच्या आदल्या दिवशी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचं आढळली आहे. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तिच्या पोटात दुखत होतं. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
समीर नारायण नाईक असं अटक केलेल्या २० वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मागील काही महिन्यांपासून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. याच अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. धक्कादायक बाब म्हणजे ती अल्पवयीन असूनही घरच्यांनी तिचा विवाह ठरवला होता. ही बाब आरोपीला देखील माहीत होती. तरीही तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. पण साखरपुड्याच्या आदल्या दिवशी पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
advertisement

आधी ओळख मग वारंवार अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये पीडित मुलगी आणि आरोपी समीर नाईक यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. मात्र, आरोपीने या संबंधांचा गैरफायदा घेत जानेवारी २०२५ पासून मुलीवर वारंवार अत्याचार करण्यास सुरुवात केली. मुलीच्या घरात आणि पोयनाड येथील आदिवासी पाडा परिसरात त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
advertisement

साखरपुडा आणि लग्नाची ठरली होती तारीख

विशेष म्हणजे पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही कुटुंबीयांनी गेल्यावर्षी तिचा विवाह ठरवला होता. त्यानुसार, ८ जानेवारी रोजी तिचा साखरपुडा होणार होता. तर २४ फेब्रुवारीला लग्नाचा मुहूर्त काढला होता. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी सुरू होती. दरम्यान, साखरपुड्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ०७ जानेवारी २०२६ रोजी पीडित मुलीला अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला तातडीने रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी दिलेल्या या माहितीमुळे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आणि या संपूर्ण गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला.
advertisement

पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

या घटनेनंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून १३ जानेवारी २०२६ रोजी आरोपी समीर नारायण नाईक याला अटक केली आहे. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act 2012) आणि भारतीय न्याय संहिता (BNS Act 2023) मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दगू बाजीराव गांगुर्डे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फेब्रुवारीत लग्न, साखरपुड्याच्या आदल्या दिवशी कळालं नवरी गरोदर, अलिबागमध्ये 15 वर्षीय मुलीसोबत नको तेच घडलं
Next Article
advertisement
BMC Election: पहिल्या तासात  ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला,  मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?
पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला, मतदान केंद्रावर खळबळ
  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू

  • काहींची नावे वगळल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

  • दादरमध्ये दुबार मतदार आढळल्याने खळबळ उडाली.

View All
advertisement