Buldhana Accident : भरधाव बोलेरो पिकअपची दुचाकीस्वाराला धडक, दुरपर्यंत फेकला गेला मृतदेह, शरीराचे झाले तुकडे तुकडे
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बुलडाणा जिल्ह्यातून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भरधाव मालवाहू बोलेरो पिकअपने दुचाकीस्वाराला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे.
Buldhana Accident News : राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भरधाव मालवाहू बोलेरो पिकअपने दुचाकीस्वाराला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. येरळी पुलावर हा भयंकर अपघात घडला आहे.हा अपघात इतका भीषण होता की तरूण दुरपर्यत फेकला गेला होता. यासोबतच या अपघातात तरूणाचा डोकं फुटून मेंदू बाहेर आला होता. जावेद खान असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.या घटनेनंतर पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तरी देखील पोलिसांविरूद्ध संताप व्यक्त होतोय.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येरळी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. त्याचं झालं असं की येरळी पुलावर ही दोन्ही वाहने प्रवास करत होती. या दरम्यान भरधाव असलेल्या मालवाहू बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा डोकं फुटून मेंदू बाहेर आला होता. हा मेंदू दुचाकीच्या सीटमध्ये जाऊन अडकून पडला होता.तर दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्याबाहेर दूरुपर्यंत फेकला गेला होता.
advertisement
या अपघातानंतर बोलेरो पिकअप चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण खांडवी गावातील स्थानिक नागरीकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले होते.तसेच स्थानिकांनी चालकासह वाहन पकडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र वाहन पोलीस स्टेशनला लावण्याऐवजी पोलिसांनी या वाहनात असलेला शेतमाल पुढे जिनिंग वर उतरवला होता. त्यामुळे पोलिसांच्या या वागणुकीने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्याचसोबत जावेद खानचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेत पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
September 27, 2025 3:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana Accident : भरधाव बोलेरो पिकअपची दुचाकीस्वाराला धडक, दुरपर्यंत फेकला गेला मृतदेह, शरीराचे झाले तुकडे तुकडे