Buldhana: बुलढाण्यात 'टक्कल व्हायरस'नंतर 'ब्ल्यू बेबी सिंड्रोम'ची दहशत! नेमका आजार काय, धोका कुणाला?

Last Updated:

बुलढाण्यात टक्कल व्हायरसनंतर आणखी एका आजाराने नाक वर काढलं आहे. ब्लू बेबी सिंड्रोम असे या आजाराचे नाव आहे.या आजाराने आता पुन्हा नागरीकांमध्ये दहशत आहे. दरम्यान हा आजार नेमका काय आहे? या आजाराचा नेमका कुणाला धोका असतो? हे जाणून घेऊयात.

buldhana blue baby syndrome
buldhana blue baby syndrome
Buldhana Hair loss : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 11 गावात टक्कल व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या आजाराच्या भितीने नागरीकांनी आठ दिवस अंघोळच केली नाही आहे.त्यात आता बुलढाण्यात टक्कल व्हायरसनंतर आणखी एका आजाराने नाक वर काढलं आहे. ब्लू बेबी सिंड्रोम असे या आजाराचे नाव आहे.या आजाराने आता पुन्हा नागरीकांमध्ये दहशत आहे. दरम्यान हा आजार नेमका काय आहे? या आजाराचा नेमका कुणाला धोका असतो? हे जाणून घेऊयात.
टक्कल व्हायरसनंतर संपूर्ण बुलढाणा जिल्हा ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या सावटाखाली आली असल्याची खळबळजनक माहिती समोर आलेली आहे. या गावातील पाण्यात नायट्रेटच प्रमाण पाचपट म्हणजे 54 मिलिग्राम वाढत असल्याने त्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोमचा धोका वाढलेला आहे. हा आजार झाल्यास बालकांच्या शरीरावरील अवयव क्षमता कमी होते.त्यामुळे या आजाराचा सर्वांधिक धोका चिमुकल्यांना आहे.
गावकऱ्यांनी 8 दिवस अंघोळच केली नाही
बुलढाणा जिल्ह्यात सुरूवातीला काहीच गावात नागरीकांना टक्कल पडत होते. मात्र आता या टक्कल व्हायरसची व्याप्ती वाढत चालली आहे. बुलढाण्यातील 11 गावात हा आजार पसरला आहे. बोंडगाव,कालवड,कठोरा,भोनगाव,मच्छीद्रखेड,हिंगणा वैजनाथ,घुई,तरोडा कसबा,माटरगाव, पहुरजीरा,निम्बी या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 104 च्यावर पोहोचली आहे. या घटनेनंतर नागरीकांनी दहशतीमुळे 8 दिवस अंघोळ केली नसल्याची बाब समोर आली आहे.
advertisement

पिण्यासाठी कोणतं पाणी वापरतात?

या भागातील पाण्याचा स्त्रोत बोअरवेल आणि विहीर आहे. पण हे पाणी वापण्याजोग योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी वान धरणाकडे धाव घेतली आहे.वाण धरण (वारी हनुमान) हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवास प्राप्त झाला आहे.त्यामुळे याच पाण्याचा नागरीकांनी पिण्यासाठी तथा वापरण्यासाठी उपयोग करावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरीकांना दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana: बुलढाण्यात 'टक्कल व्हायरस'नंतर 'ब्ल्यू बेबी सिंड्रोम'ची दहशत! नेमका आजार काय, धोका कुणाला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement