तीन दिवसांपासून गायब, कंपनीतल्या सुपरवायझरचा खून, हात पाय बांधून विहिरात फेकले, मारेकरी पळाले

Last Updated:

Buldhana Crime: बुलढाण्यातली हरेकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये सुपरवायझर असेलल्या घनश्याम रमेशचंद्र भुतडा यांचा खून करून त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला आहे.

बुलढाणा क्राइम
बुलढाणा क्राइम
राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा : खामगावातून बेपत्ता झालेल्या घनश्याम भुतडा यांची मलकापूर तालुक्यात हत्या करण्यात आली आहे. हातपाय बांधून त्यांना टाकले विहिरीत टाकण्यात आले होते. धानोरा शिवारात त्यांचा मृतदेह आढळला.
तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या खामगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणारे घनश्याम रमेशचंद्र भुतडा यांची अज्ञात मारेकऱ्यांनी मलकापूर तालुक्यात हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हातपाय बांधून मलकापूर तालुक्यामधील धानोरा शिवारातील एका विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या करण्यात आली असल्याने खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महामार्गालगतच्या विहिरात भुतडांचा मृतदेह

advertisement
घनश्याम रमेशचंद्र भुतडा हे हरेकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत होते. मारेकरऱ्यांनी कोणत्या कारणामुळे भुतडा यांचा खून केला, हे अद्याप समोर आलेले नाही. मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत भुतडांचा मृतदेह आढळून आला.

खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल

मलकापूर पोलिसांनी पंचनामा करून भुतडा यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांचे हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. यावरूनच त्यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
advertisement

नेमकी घटना काय?

दरम्यान त्यांच्या मुलाची शेगाव येथील एका कॉलेजमध्ये प्रवेशाकरिता निवड झाली आहे. प्रवेशासाठी सुटाळा येथील एका शिक्षकाकडे चौकशीकरिता जातो असे सांगून ते २ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपासून घराबाहेर पडले होते. तेव्हापासून ते बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात संजय पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत भुतडांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. यावरून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना विहिरीत फेकले असावे असा कयास पोलिसांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी नातेवाइक रवींद्र सुभाष भुतडा रा. वरूड, ता. मोताळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तीन दिवसांपासून गायब, कंपनीतल्या सुपरवायझरचा खून, हात पाय बांधून विहिरात फेकले, मारेकरी पळाले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement